Breaking News

अतिरेक्यांकडून ठार झालेल्यांना आपण शहीद मानत नाही : साध्वी प्रज्ञासिंग जास्तीत जास्त मुले जन्माला घालून माझ्याकडे द्या: नागरीकाना आवाहन

औरंगाबाद : प्रतिनिधी

मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांकडून ठार झालेल्यांना आपण शहीद मानतच नसल्याचे खळबळजनक वक्तव्य मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून जामीनावर बाहेर आलेल्या साध्वी प्रज्ञासिंग हीने सोमवारी औरंगाबादेत केले. त्यामुळे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि त्यांच्या अंकित संघटनांचा कथित देशप्रेमाची भूमिका उघडकीस आली.

शिवजयंती आणि जनूभाऊ रानडे यांच्या स्मृतीदिना निमित्त सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात प्रज्ञासिंग यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

२६/११ च्या हल्ल्या त शहीद झालेल्या पोलिस अधिकार्‍यांबद्दल प्रज्ञासिंग यांनी नाव न घेता कडवट टिका केली. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, मदरश्यां आणि मिशनर्‍यांकडून संस्कार आणि संस्कृतीला हरताळ फासला जातोय. त्यामुळे मदर और मदरसे दोनोही नही चाहिये. तसेच भगवा आतंकवादाच्या नावाखाली देशातील संन्याशी आणि हिंदू देशभक्तांचा छळ करण्यात आला होता. हे षडयंत्र रचणारे कोण आहेत हे सर्वांनाच माहित आहे. त्याच प्रमाणे वर्दी असणार्‍यांनीच देशसेवा करावी असा काही नियम नाही.

या देशातील प्रत्येकाला मातृभूमीसाठी बलिदान करण्याचा हक्क असल्याचे सांगत तुम्ही जास्तीतजास्त मुलांना जन्म द्या व माझ्याकडे सोपवा मी त्यांना कट्टर राष्र्टभक्त म्हणून तयार करेन असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Check Also

ऑपरेशन सूरत-२ इंदौरमध्येही भाजपाकडून असाच प्रयोग

लोकसभा निवडणूका जाहिर होताच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *