Breaking News

बहुजन आघाडीला झाली अखेर वंचितांची आठवण झोपडपट्यांमध्ये ? अन्नधान्याची मदत

मुंबई : प्रतिनिधी
मागील दोन महिने राज्यात लॉकडाऊन लागू असताना अनेक गरिब, गरजू, स्थलांतरीत कामगार, राज्यातील परजिल्ह्यातील कामगारांनावर खऱ्या अर्थाने वंचित म्हणून जगण्याची वेळ आली होती. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते कार्यकर्त्ये दिसत नव्हते. अखेर लॉकडाऊनचा ४ था टप्पा संपत आल्यानंतर अन्न धान्याची वाटप करण्याचे काम सुरु केले.
धारावी पाठोपाठ मुंबईत सर्वात मोठी झोपडपट्टी ही अणुशक्तीनगर (चेंबूर) परिसरात आहे. या भागात मानखुर्द पासून ते माहुल गाव पर्यंत गरीब,गरजू मजूर, नाका कामगार, कंत्राटी कामगार, घरकाम करणारे कामगार तसेच हातावर पोट असणारे कामगार मोठ्या प्रमाणावर राहतात. अशा लोकांना मदत करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यानुसार मुंबईसह राज्यात मदतीला सुरुवात झाली. अणुशक्तीनगर (चेंबूर) परिसरात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अनिल वाकोडे, सुरेश वाघमारे, ज्योति यादव, सुनीता डोळस, जया इंगळे यांनी मदतीला सुरुवात केली. अनेकांनी फोन करून मदत मागितली तर काहींनी यादी पाठवून मदत देण्यास सांगितले. त्यानुसार वाशीनाक परिसरातील भारत नगर, आर.एन.ए. पार्क, मुकुंद नगर, म्हाडा कॉलनी तर मानखुर्द भागातील मानखुर्द गाव, मंडाले, पांजरापोळ, प्रेम नगर या भागात मदत देण्यात आली. गरजू लोकांना तांदूळ, गहू, तेल, डाळ, चहा पत्ती, मीठ, हळद यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच मास्क,स्यानेटायझरचे ही मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले. मकरंद कांबळे, अमोल मुळे, संदेश पोळ, संतोष लोखंडे या कार्यकर्त्यांनी मदत वाटपात सहकार्य केले.अणुशक्तीनगर (चेंबूर) भागात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी असल्याने करण्यात येणारी मदत अपुरी पडत आहे. गरजवंतांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक दानशूर व्यक्तींना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी मदतीसाठी पुढे यावे. मुंबई शहराने कोणालाही उपाशी ठेवलेले नाही. या शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार, घर आणि पोटाला अन्न दिले आहे. अश्या आणीबाणीच्या काळात ही मुंबईकरांनी एकमेकांना मदत करावी, असे आवाहन अनिल वाकोडे, सुरेश वाघमारे यांनी केले आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *