Breaking News

मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी करणार आता वर्क फ्रॉम होम व्हॉट्स अप, ईमेल, एसएमएसचा वापर करून काम पूर्ण करण्याचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी
कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने शासकिय कार्यालयातील उपस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचारी-अधिकाऱ्यांनी घरातच बसून शासकिय काम करण्यास राज्य सरकारने परवानगी देत त्यासाठी व्हॉट्सअप, ई-मेलचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली असून या दोन्हींच्या माध्यमातून कामे पूर्ण झाल्याची माहिती मोबाईल एसएमएसद्वारे संबधितांना करण्यास सांगण्यात आले असून यासंदर्भातील आदेश नुकताच काढण्यात आला. विशेष म्हणजे ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंत्रालयात हजर राहण्यास सांगितले नाही. त्यांनी आता घरी बसून कामाचा निपटारा करायचा आहे.
या आदेशानुसार प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांचा शासकिय ई-मेल, अथवा वापरात असलेला ई-मेल, व्हॉट्सअप क्रमांक असलेला मोबाईल क्रंमाक आदींची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवायची आहे.
शासकिय कामकाजासाठी त्यांच्या ईमेलचा जास्तीत जास्त वापर करावा त्यांच्याकडील कामाचा लवकरात लवकर निपटारा करावा.
तसेच एखादा प्रस्ताव किंवा त्यावरील टिपण तयार करून ई-मेलवर फॉरवर्ड केल्यानंतर त्याची माहिती संबधित अधिकाऱ्यास एसएमएसद्वारे किंवा व्हॉट्सअॅपद्वारे द्यावी. तसेच सदरचा प्रस्ताव पाठविताना सर्वोच्च अधिकाऱ्यास ई-मेलच्या सीसीमध्ये ठेवण्याचे आदेश द्यावे.
ई-मेलवरून पाठविलेला प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आल्यानंतर तो मान्य केल्याचा शेरा त्यावर लिहून तो अंतिम कार्यवाहीसाठी पुढे पाठवावा असे सांगण्यात आले आहे.
सदर आदेशाची अंमलबजावणी विभागाचे सर्व अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व विभागांनी या सूचनांचे पालन करावे असे आदेश बजाविण्यात आले. तसेच या पध्दतीने करण्यात आलेले काम ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, मंत्रालयासह रेड झोनमधील सर्व महापालिका क्षेत्रातील शासकिय कार्यालयात १५ टक्के किंवा त्याहून अधिक उपस्थितीत बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील किमान एक दिवस तरी कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले असून जो कर्मचारी गैरहजर राहील त्याचे आठवडाभराची रजा समजून त्याचे वेतन कपात केले जाणार असल्याचेही राज्य सरकारने स्पष्ट केले.                                                                                           

Check Also

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *