Breaking News

काँग्रेसने भूमिका स्पष्ट करताच संजय राऊत म्हणाले, उध्दव ठाकरे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा राहुल गांधी यांनी लंडनमधील आवाहनानंतर संजय राऊतांनी केली भूमिका जाहिर

सध्या परदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आगामी २०२४ च्या निवडणूकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे मत लंडन येथील भारतीय पत्रकार संघटनेने घेतलेल्या मुलाखती दरम्यान व्यक्त केले. त्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजपाच्या विरोधात लढण्यासाठी जे सोबत येतील त्यांना घेऊन जाऊ अशी भूमिका स्पष्ट केली. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आगामी निवडणूकांच्या अनुषंगाने विरोधकांकडून पंतप्रधान पदासाठी उध्दव ठाकरे यांचा चेहरा आहेत असे सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा होती. या सभेतून त्यांनी शिंदे गटासह भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. आगामी निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीविरोधात निवडणूक लढवावी, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केले होते. त्यानंतर काँग्रेसची भूमिका आणि संजय राऊत यांनी केलेले वक्तव्याला महत्व आले आहे.

यापूर्वीच्या २०१४ आणि २०१९ च्या दोन्ही निवडणूकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीकडून राहुल गांधी यांचा चेहरा पुढे करण्यात आला होता. मात्र या दोन्ही निवडणूकांमध्ये काँग्रेसचा दारूम पराभव झाला.

२०२४ लोकसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेनुसार उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का? असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, हे पाहा याबाबत आता भाकीत करणं तेवढं सोपं नाही. राजकारणात काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरे हा एक उत्तम चेहरा आहे. महाविकास आघाडीने ठरवलं होतं की, उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आपण एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करू… आज विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो. कारण एकतर महाराष्ट्र मोठं राज्य आहे. ते ठाकरे आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. याचा विचार भविष्यात आमचे इतर सहकारी करू शकतात असे सूचक वक्तव्यही केले.

तसेच संजय राऊत म्हणाले, पण शेवटी या देशातला मुख्य चेहरा कोणता असेल, यापेक्षा विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. पंतप्रधान कोण असेल हे आपल्याला नंतर ठरवता येतं. पण आधी एकत्र येऊन निवडणुका लढवणं महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी एकत्र येण्यावर उद्धव ठाकरेंचा भर आहे, स्पष्ट केले.

Check Also

शरद पवार यांनी सांगितला आर आर पाटील यांच्या राजकिय प्रवेशाचा किस्सा

देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. एक वेगळी विचारधारा देशात निर्माण झाली आहे. ज्यांना स्वातंत्र्य चळवळशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *