Breaking News

राज्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गेट-वे ऑफ इंडिया समोर होणार गौरव महिला दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे विविध कार्यक्रम- पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

राज्याच्या पर्यटन विभाग आणि इंडियन ऑईल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व क्षेत्रांतील महिलांच्या योगदानाचा गौरव ‘मल्टीमिडीया लाइट ॲण्ड साऊंड शो’ च्या माध्यमातून करण्याचे निश्चित केले आहे. या दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे महिलांसाठी विशेष शो आयोजित करण्यात येणार असून, यासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रांतील महिलांचाही सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पर्यटनमंत्री लोढा म्हणाले, स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त गेट वे ऑफ इंडियाच्या भिंतीवर देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाची आठवण करून देणारा ‘मल्टीमिडीया लाइट ॲण्ड साऊंड शो’ २८ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला आहे. ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे रात्री ८ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व महिला अधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. या कार्यक्रमाला राज्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या महिलांना आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रात योगदान दिलेल्या महिलांची माहिती देणारा पाच ते दहा मिनिटांचा मल्टीमिडीया लाईट ॲण्ड साऊंड शो यावेळी होणार आहेत. तसेच महिला आणि बालविकास विभागामार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण या दिवशी करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

मंत्री लोढा म्हणाले,मुंबई उपनगरमध्ये महिलांसाठी फिरते कौशल्य विकास केंद्र तसेच फिरते स्वच्छता गृह हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविला जात असून उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर इतर महानगरातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय,पर्यटन संचालक बी.एन.पाटील, महिला व बालविकास आयुक्त आर.विमला, इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक बी.एन.दास,पर्यटन विभागाच्या सहसचिव उज्जला दांडेकर यावेळी उपस्थित होत्या.

Check Also

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *