Breaking News

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकला नाही बीडच्या सभेत जयंत पाटील यांची ग्वाही

जेव्हा देशात दिल्लीश्वरांचे राज्य होते तेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने मराठी भूमीला स्वाभिमानाची जाणीव करून दिली. त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनीही आपल्या पित्याच्या स्वाभिमानाची परंपरा पुढे चालवली. महाराष्ट्र दिल्ली समोर कधीच झुकला नाही असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या स्वाभिमान सभेत बोलताना म्हणाले आहे

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी सुडाचे राजकारण नाही तर प्रेमाचे राजकारण केले. यामुळे आजही ते जनमानसात जीवंत आहेत; पण आज अनेकजण राजकीय स्वार्थापोटी सुडाचे राजकारण करत समाजात वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असा आराेपही त्‍यांनी केला. राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरूगांत गेले. त्‍यांनी सुडाच्या राजकारणाविरोधी लढत देशातील युवकांपुढे वेगळा आदर्श घालून दिला.

धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये शरद पवार यांच्या स्वागतासाठी पोस्टर्स लावले. त्यांना आजही शरद पवारांच्या आशिर्वादाची गरज असल्याचे ऐकूण बरे वाटले असेही यावेळी बोलताना म्हटले.

सभेच्या वेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जे गेले ते बरेच झाले. कभी कभी सैलाब आता है और सबकुछ बदल देता है तसाच आताही सैलाब आला आणि आमचा संदीप क्षीरसागर नेता झाला. नाहीतर तो तरी कधी नेता म्हणून पुढे आला असता. चांगल्या चांगल्यांना आपण आजपर्यंत छातीवर घेतले आहे. आले अंगावर घेतले शिंगावर हा शरद पवारांचा नियम आहे. आणि आपण सर्व त्यांचे चेले आहोत. डरेंगे नाही तर लढेंगे. हा सगळा धनशक्ती विरोधात जनशक्तीचा मेळावा आहे. साहेबांचाच फोटो वापरायचा, आणि साहेबाच्याच नावाने दिशाभूल करायची अशा शब्दांत टीका केली.

आता तुम्ही नाद केला आहे. अऱे संदीप तुझी आजी आज आकाशातून , प्रेमाने आनंदाने बघत असेल. कारण मला तुझ्याकडून बघून ही अपेक्षा नव्हती. पण तो ज्यावेळी खात्रीने सांगायचा की, साहेब, तुम्ही येऊन बघा, काय करतोय ते एकदा येऊन बघा. पण हा भगवानबाबाचा, वंजारीसमाजाचा पोरगा तुला शब्द देतो की, बीडच्या लढाईत तु्झ्या खांदाला खांदा लावून लढेन. बबन गीते, शंकर बांगर आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहेत. हा बीड जिल्हा आपण पुन्हा हलवून टाकू हा साहेबांना शब्द देतो. साहेबांना डिस्टर्ब करण्यासाठी, त्यांची राष्ट्रीय प्रतिमा मलीन करण्यासाठी केले जात आहे असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे

संदीप क्षिरसागर म्हणाले की, काय भाषणं करायची. मोठ्या व्यासापीठावर आम्ही कधी भाषणं केली नाहीत आम्ही फक्त भाषणं बघायचो. काय हातवारे करायचे, असा असा मी नाव कोणाचं घेतलं नाही. तुम्ही म्हणाल नाव घेतलं म्हणून. कोणाचाही नाद करा पण साहेबांचा नाद करायचा नाय असे एका भाषणात धनंजय मुंडे म्हणाले होते. मुंडे यांच्याच शैलीत संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांच्या समक्ष वरील वाक्य बोलून दाखवले. त्यावेळी उपस्थितीतून एकच जल्लोष झाला. सोडून जाणारे नेते पूर्वी कशी भाषणे करायची काय म्हणायचे याची आठवण संदीप क्षीरसागर यांनी करुन दिली. मात्र कोणी कोठेही गेले तरी जनता शरद पवारांसोबतच असल्याचे संदीप क्षिरसागर म्हणाले.

ही मंडळी जेव्हा लोकांत जाईल तेव्हा लोक त्यांना जागा दाखवून देतील असा संदीप क्षिरसागर यांनी बोलताना म्हटले. काही लोक आम्हाला म्हणाले की आम्ही सत्तेत आहेात. आमच्यासोबत मोदी आहेत तुमच्याकडे काय आहे. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे साहेब आहेत. बीड आणि मराठवाड्याची जनता स्वभिमानी आहे. आयुष्यभर साहेब तुमच्यासोबत, तुमच्या विचारांसोबत राहील असेही क्षिरसागर यांनी म्हटले आहे

यावेळी सभेला संबोधित करताना रोहित पवार म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब ज्या विचारासाठी लढत आहे. आपला महाराष्ट्र धर्माचा विचार फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राचा अस्मितेसाठी युवकांनी हे आव्हान करायचे आहे. पवार साहेब या वयामध्ये सुद्धा तुमच्या आमच्या सर्वांसाठी या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत आहे. एका बाजूला सत्ता आहे आणि एका बाजूला विचार आहे आम्ही सर्वजण विचाराबरोबर राहिलो आहे. सर्वांना माहिती आहे का आम्हा सर्वांना करावा लागणार आहे. आपण मोठ्या शक्तीच्या विरोधात म्हणजे भाजपच्या विरोधात लढत आहोत उद्या जाऊन कदाचित आमच्यावर कारवाई पण केली जाईल. कोणाला काहीही केले तरी आम्ही साहेबांना सोडणार नाही असा शब्द आहे देतो. लहानपणीपासून एकच गोष्ट आपण सर्वांनी लहानपणीपासून एकच म्हणजे महाराष्ट्रातला सह्याद्री दिल्ली समोर कधीही झुकत नाही, असेही सांगितले.

Check Also

रोहित पवार यांचा आरोप, …ही तर भाजपाची रणनीती अजित पवार शरद पवार यांची भेट कौटंबिकच

राज्याच्या राजकारणात इतके दिवस अभेद्य मानले जाणारे पवार कुटुंबिय मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *