Breaking News

उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, उमेदवारांचा आग्रह धरू नका आपण… ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी सांगितले

राज्यातील आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्यादृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरु केले आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडूनही मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु केली असून आपल्या समर्थक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला लढायचे आहे. त्यामुळे उमेदवारांचा आग्रह धरू नका, पण त्याची तयारी ठेवा, असे आवाहन केले.

शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केले. गुरुवारी नाशिक, अहमदनगर, दिंडोरी लोकसभा मतदार संघाचा ​मातोश्री निवासस्थानी आढावा घेतला. यावेळी आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बूथ प्रमुखांसोबत इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून संघटनात्मक ताकद वाढवा, अशा सूचना ठाकरे यांनी बैठकीत दिल्या.

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ४८ मतदारसंघांतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. बुधवारी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि रावेर या चार लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला होता. गुरुवारी अहमदनगर, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. पक्षातील फुटीनंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात कुठल्या विधानसभा मतदार संघात आपल्या पक्षाची किती ताकद आहे? याचा आढावा घेतला. तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी तयारीला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या.​

दरम्यान, अहमदनगरची लोकसभेची जागा भाजपाकडून खेचून घेण्याचा पण उद्धव ठाकरे यांनी केला असून कोणत्याही परिस्थितीत अहमदनगरचे भाजपाचे खासदार सुजय विखे-पाटील यांचा पराभव करण्याच्या अनुषंगाने सैनिकांनी तयारीला लागावे असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करत अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा जागा लढायच्या याबाबत उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना विचारणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले, या लोकसभा जागेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी असो आपल्याला एकत्र मिळून ही निवडणूक लढायची आहे आणि त्या उमेदवाराला साथ द्यायची आहे, असेही स्पष्ट केले.

Check Also

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील मृतांना ५ लाखांची मदत जखमींवर मोफत उपचार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

डोंबिवली (घेसरगाव) येथून खासगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *