Breaking News

भाजपा-सेनेच्या सत्ता उन्मादाला जनतेने नाकारले विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबईः प्रतिनिधी
या निवडणुकीत दिसलं की भाजप – सेनेच्या लोकांचा सत्तेचा उन्माद जनतेला पसंद पडला नाही.मुळात जमिनीवर पाय ठेवून चालले की, त्यांचे स्वागत होते. परंतु त्यांनी सीमा ओलांडली होती अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
विधानसभा निवडणूकांचे निकाल दुपारपर्यंत स्पष्ट झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सांगण्यात आले होते २२० पार मात्र लोकांनी ते स्वीकारलेले नाही. लोकांनी निर्णय दिला असल्याचा टोला भाजपाला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेने दिलेला निर्णय विनम्रपणे स्वीकारला आहे. महाआघाडीतील सर्व पक्षांनी मनापासून परस्परांना सहकार्य केले. राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. त्याबद्दल सर्वांचे शरद पवार यांनी सर्वांचे आभार मानले.
निवडणूकीत एवढं लक्षात आलं की, ज्यांनी पक्षांतर केले. त्या लोकांना पाठिंबा जनतेने दिलेला नाही. जनतेने त्यांच्याविरोधी भूमिका घेतली. सातारा ही लोकसभेची एकच जागा होती. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सातारच्या गादीबद्दल सर्वांना आदर होता. परंतु त्या गादीशी इमान ठेवले नाही, तर काय होते हे लोकांनी दाखवून दिले असे सांगतानाच आमचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना जनतेने चांगले मताधिक्य दिले. त्याबद्दल सातारकरांचे आभार मानले. परंतु मी तिथे जावून सातारकर जनतेचे आभार मानणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
उद्यापासून दिवाळी सुरु होत आहे.त्यामुळे दिवाळीनंतर आमची बैठक होईल.त्यानंतर मित्रपक्षांसोबतही होईल. एकंदर जनमत पहाता पक्ष उभारणीची काळजी घेणे शिवाय नव्या पिढीला बरोबर घेऊन तो अजुन व्यापक करणार आहे. राज्य पातळीवर ठिकठिकाणी जावून प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
आम्ही आमचा पक्ष मित्रपक्ष यांना घेवून काम करणार आहोत. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसवलं आहे. आम्ही त्याचा स्वीकार करत असल्याचेही ते म्हणाले.
देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांनी निवडणूकीच्या दृष्टीने महाराष्ट्राचे दर्शन घेतले त्याबद्दल त्यांचे आभारही त्यांनी मानले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *