Breaking News

भाजप राष्ट्रवादी नेत्यांच्या पाठी लागलीय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी
भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे लागली आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला आहे.
आमचे नेते खेचण्यासाठी सर्व मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. सरकारी यंत्रणांची मदत घेतली जात आहे असा आरोप करतानाच भाजपने दुसरा पक्ष फोडण्यापेक्षा काम केले असते तर जनतेचा आशिर्वाद मिळाला असता असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
दरम्यान प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी आज राज ठाकरे भेटीत काय ठरले हे लवकरच जाहीर केले जाईल असे सांगितले. या बैठकीला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार,शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते असे स्पष्ट केले.
इतर पक्ष अशाप्रकारे फोडला जात आहे हे भाजपचे कमकुवतपणाचे उदाहरण आहे. अनेक लोकं भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. जेव्हा जेव्हा नेत्यांनी अशा प्रकारे पक्ष बदलला आहे तेव्हा तिथल्या जनतेने त्या नेत्यांना धडा शिकवला आहे. याची जाणीव जाणाऱ्या लोकांना करुन दिल्याचे ते म्हणाले.

नूतन प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पदभार स्वीकारला
शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून नियुक्ती जाहीर केली होती. आज रुपाली चाकणकर यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्षा पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
सामान्य लोकांच्या मनातील खदखद आणि प्रश्नांवर सरकारला जाब विचारला जाईल अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी चाकणकर यांनी मांडली.
कोण पक्ष सोडून गेले म्हणून पक्षाचे काम थांबत नाही. ३६५ दिवस आव्हाने सुरुच असतात. निश्चितच चांगल्या पद्धतीने काम केले जाईल. जे आव्हान येईल त्याला तोंड देण्याची आमची तयारी असणार आहे असे सांगतानाच दोन दिवसानंतर संपुर्ण महाराष्ट्रात दौरा सुरु करुन संघटना चांगल्या पद्धतीने बांधली जाईल असेही त्या म्हणाल्या.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *