Breaking News

सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना सवाल, मग यांना मारहाणीची भाषा कराल का? कंगना राणावत, केतकी चितळे, अमृता फडणवीस यांचे फोटो शेअर करत केला सवाल

मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद हीच्या चित्र-विचित्र फॅशनवरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी नुकतीच उर्फी हिच्यावर टीकेची झोड उठवत तीला थोबडविण्याची धमकी दिली. त्यास प्रत्युत्तर म्हणून उर्फी जावेद हीनेही चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळात असताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी या वादात उडी घेत अमृता फडणवीस, कंगना राणावत, केतकी चितळे यांचे अर्धनग्न असलेले फोटो फेसबुकवरील अकाऊंटवरून शेअर करत यांना मारहाणीची भाषा कराल का? असा सवाल केला.

सुषमा अंधारे यांनी फेसबूकवर अमृता फडणवीस यांच्यासह कंगना राणौत आणि केतकी चितळे यांचे अर्धवट कपड्यातील फोटो शेअर करत हा सवाल विचारला आहे. यामध्ये त्यांनी अमृता फडणवीसांचा स्विमिंग पूलमधील एक फोटोही शेअर केला आहे.

सुषमा अंधारेंनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं, मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त ‘कम्फर्टेबल’ आणि ‘कॉन्फिडंट’ वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव बहुतांशी वेळा साडीच असतो, फार फार तर मी सलवार सूट परिधान करते. यामुळे इतरांनीही माझ्यासारखाच पेहराव करावा, असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये ‘कम्फर्टेबल’ वाटतं, त्याप्रमाणे तो कपडे परिधान करतो. प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरजसुद्धा असते. उदाहरणार्थ, टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच…

अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया… पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल, तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेदसारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणौत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना मारहाणीची भाषा कराल का? असा सवाल अंधारेंनी फेसबूक पोस्टद्वारे विचारला.

नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धी झोतात आणि चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल… असा टोला सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.

सुषमा अंधारे यांच्या फेसबुक पोस्टची खाली दिलेली लिंक 

http://<iframe src=”https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fandhare.sushama%2Fposts%2Fpfbid09FRB7yFdYrcADZbFjv2eSjZJ6KB1DSMyLsGfuMUt3VuThUhqJACuHTdaDwwVzFxQl&show_text=true&width=500″ width=”500″ height=”679″ style=”border:none;overflow:hidden” scrolling=”no” frameborder=”0″ allowfullscreen=”true” allow=”autoplay; clipboard-write; encrypted-media; picture-in-picture; web-share”></iframe>

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *