Breaking News

भाजपा वगळून सत्ता स्थापन करण्याची काँ-राच्या मित्रपक्षांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीची बैठक संपन्न

मुंबईः प्रतिनिधी
सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जी चर्चा झाली याबाबतची संपूर्ण माहिती आघाडीतील मित्र पक्षांना देण्यात आली असून भाजप वगळून सरकार स्थापन व्हावे असे मित्र पक्षांनाही वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडीतील मित्रपक्षाच्या नेत्यांसोबत आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, रिपाई कवाडे गट, समाजवादी पार्टी, जनता दल, रिपाई खरात गट, श्रमिक मुक्ती दल, आदींसह इतर सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. आघाडीतील मित्रपक्षांशी आज चर्चा केली. विकासासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे सांगितले असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेबरोबर आज किंवा उद्या चर्चा करेल आणि त्यानंतर चर्चा झाल्यावर सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.
याबैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ,
धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हेमंत टकले तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वड्डेटीवार, नितीन राऊत यांच्यासह समाजवादी पार्टीचे अबू आझमी, रिपाई कवाडे गटाचे जोगेंद्र कवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, अनिल गोटे, शेकापचे नेते मिनाक्षीताई पाटील, बाळाराम पाटील, धैर्यशील पाटील, सचिन खरात ( रिपाई खरात गट ), जनता दलाचे सुहास बने, निरंजन शेट्टी श्रमिक मुक्ती दल, अॅड. सुरेश माने आदी उपस्थित आहेत.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *