Breaking News

मित्र पक्षांनी कमळाच्या चिन्हावर लोकसभा लढवावी मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत

मुंबईः प्रतिनिधी
भाजप मित्रपक्षांच्या पदरात लोकसभेची जागा पडणार नसून बारामतीत ही कमळ चिन्हांवरच निवडणूक लढवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत युतीच्या महाआघाडीतील मित्रपक्षांना स्वतंत्र जागा देणार नसल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मीडिया रूम चे उदघाटन झाले यावेळी ते बोलत होते .
भाजपमध्ये कुणाचीही नाराजी नाही. गेल्या निवडणुकीत युतीने ४२ जागा निवडून आणल्या होत्या. या निवडणुकीत त्यापेक्षा मोठी लाट असून विक्रमी जागा निवडून आणणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
सेना – भाजपच्या युतीमधील जागांची अदलाबदल ही होणार नसल्याचे स्पष्ट करत येत्या दोन दिवसात भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी प्रकशित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे . युतीतल्या नेत्यांमध्येही कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. त्यामुळे भाजपसाठी अतिशय अनुकूल वातावरण असून विक्रमी यश मिळेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *