Breaking News

भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदी पुन्हा चंद्रकांत पाटीलच माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अधिवेशन रविवारी १६ फेब्रुवारी रोजी स्व.राम कापसे नगर, नवी मुंबई येथे होत आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीच पुन्हा याच पदावर नियुक्ती करण्यात आली असून १० हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ते पदाची सूत्रे हाती घेणार असल्याची माहिती भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी दिली.
या अधिवेशनात महाराष्ट्रातील पुढच्या राजकीय वाटचालीची दिशा कार्यकर्ते व जनतेला देण्यात येईल. विधानसभा निवडणुकीत जनादेश मिळून सुध्दा शिवसेनेने जनादेशाचा अपमान करुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ पकडल्यामुळे जे नवीन राजकीय समीकरण महाराष्ट्रात निर्माण झाले त्या बाबतची स्पष्ट दिशा आणि आगामी कामाची योजना या अधिवेशनात ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत आजच नियुक्त झालेले प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील अध्यक्ष पदाची सूत्रे या अधिवेशनात स्वीकारतील. या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, माजी अर्थमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्यासह पक्षाचे विविध नेते उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या दोन दिवस चालणा-या राज्यस्तरीय अधिवेशनात पहिल्या दिवशी विधानसभेत विस्तारक म्हणून गेली दोन वर्षे काम करत होते त्यांची बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीतील समीकरणे, वास्तव चित्र यांचे विश्लेषण, त्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नियोजन याचा विचार होईल. तसेच दुपारी २.०० वाजल्यापासून राज्यातील भाजपा खासदार, आमदार, जिल्हा अध्यक्ष, महापौर, जि.प. अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी यांची बैठक होऊन त्यात सद्य राजकीय स्थिती यावर चर्चा होउन पक्षाची आगामी दिशा व आगामी धोरण ठरविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
१६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राज्य परिषद अधिवेशनाला सुरुवात होईल. या अधिवेशनाला महाराष्ट्रातील भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी, नगरपालिका पासून ते खासदारांपर्यंत, मंडल अध्यक्षांपासून जिल्हा अध्यक्ष, सरचिटणीस, आघाडयांचे संयोजक असे सुमारे १० हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील. या प्रतिनिधींना राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी हे मार्गदर्शन करतील. त्याच उद्घाटन सत्रात प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील.
तर राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करतील.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *