Breaking News

त्या तरूणाच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पेपर तपासणीचे कृषीमंत्र्याचे आदेश वडीलकीच्या नात्याने समजावीत न्याय देण्याची कृषीमंत्र्यांनी दिली ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी

मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अविनाश शेटे याच्या कृत्याची तात्काळ दखल घेत कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी शेटेने दिलेल्या सहाय्यक कृषी अधिकारी पदासाठीच्या २०१३ च्या परीक्षेतील उत्तर पत्रिकेची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले. तसेच त्याचे सांत्वन करून न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले.

कृषीमंत्र्यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी अविनाश शेटे यांना दुपारी दोनच्या सुमारास मंत्रालयात आपल्या दालनात बोलावून घेतले. त्याच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी अविनाश सोबत त्याचे वडील देखील उपस्थित होते.

अविनाशची कैफियत ऐकून घेतल्यानंतर कृषीमंत्र्यांनी कृषी आयुक्तालयाला दूरध्वनीवरून सुचना देत याप्रकरणाची फाईल सोमवारी मंत्रालयात घेऊन येण्याचे निर्देश दिले.

अविनाशला वडीलकीच्या नात्याने समजावीत न्याय मागण्यासाठी आत्महत्या हा काही मार्ग होऊ शकत नाही. असा राग डोक्यात घालू नकोस, तुला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. जीव लाखमोलाचा आहे, अशा शब्दात त्याची समजूत काढली.

अविनाशच्या म्हणण्यानुसार २०१३ मध्ये त्याने दिलेल्या सहायक कृषी अधिकारी पदाच्या परीक्षेत त्याला कमी गुण मिळाले. यावेळी दिलेल्या पेपरची फेरतपासणी करावी अशी मागणी त्यानी केली. त्यानुसार त्याच्या पेपरची फेरतपासणी करण्याचे कृषीमंत्र्यांनी सूचना दिल्या.

यावेळी कृषीमंत्र्यांनी अविनाशची आस्थेने चौकशी करून पुन्हा असा मार्ग पत्करू नको असे सांगितले. सुशिक्षित व्यक्तीने असे पाऊल उचलू नये याचा पुनरुच्चार करीत त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाहीही  दिली.

Check Also

पंतप्रधान मोदी यांची सवाल, राहुल गांधी यांनी अंबानी, अदानीवरील टीका अचानक का थांबवली?

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून काँग्रेस पक्षाने अंबानी आणि अदानी यांच्यावरील कडवट टीका थांबवल्याचा आरोप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *