Breaking News

अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा विधानसभाध्यक्ष बागडे यांच्याकडून मंजूर

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असतानाच विद्यमान विधानसभा सदस्यत्वाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी राजीनामा आज दिला. विशेष म्हणजे त्यांनी हा राजीनामा विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जावून दिल्याने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याची माहिती विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली.
राज्य शिखर बँकेच्या कथित आर्थिक घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नावाबरोबरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचेही नाव समाविष्ट आहे. यासंदर्भात चौकशीची नोटीस बजाविण्याआधीच पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याची तयारी दाखविली. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पवार हे ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला.
परंतु, शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला राज्यातील सर्वचस्तरातून पाठिंबा मिळाल्याने पवार हे संपलेले नसल्याचा संदेश राज्याच्या राजकारणात गेला. मात्र अजित पवार यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला मिळालेले राजकिय पाठबळाची वाताहत होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विद्यमान विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबर पर्यंत आहे. तरीही त्यांनी राजीनामा दिल्याने याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *