Breaking News

राऊतांच्या आरोपावर सोमय्या म्हणाले, माझी व कुटुंबियांची जरूर चौकशी करावी डॉ. किरीट सोमय्या यांचे आव्हान

मराठी ई-बातम्या टीम

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विरोधात सातत्याने आरोप करत कोणत्या नेत्यांच्या घरावर धाडी पडणार, कोणाची संपत्ती जप्त होणार, कोणाची अनधिकृत मालमत्ता आहे यासह अनेक गोष्टींची भाकित करत होते. परंतु मागील काही दिवसांपासून सोमय्या हे जम्बो कोविड सेंटर वाटपात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर बेनामी कंपनीचा आरोप करत होते.

सोमय्यांच्या या आरोपामुळे संजय राऊत यांनी अखेर सोमय्या यांची कंपनी आणि त्या कंपनीतील पार्टनर असलेल्या पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांची असल्याचा गौप्यस्फोट करत सदरची निकॉन कंपनीचे संचालक नैल सोमय्या हे असल्याचा आरोप करत वाधवानकडून ब्लँकमेल करून पैसा मिळविल्याचा आरोपही केला.

संजय राऊत यांच्या या आरोपावर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यानी प्रत्युत्तर देत, २०१७ मध्ये संजय राऊत संपादक असलेल्या सामना ने माझ्या पत्नीच्या नावाने असेच आरोप केले होते. आज त्याच बांधकाम व्यावसायिकाचे नाव घेऊन माझ्या मुलावर आरोप केले जात आहेत. या आरोपाबाबत ठाकरे सरकारने माझी जरूर चौकशी करावी, असे प्रतिआव्हान दिले.

ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध आतापर्यंत १० गुन्हे दाखल केले आहेत, आणखी ३ दाखल होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता आणखी एका चौकशीस मी तयार आहे. खुशाल चौकशी करा. मी व माझ्या कुटुंबियांचा कोणत्याही भ्रष्ट, चुकीच्या व्यवहारात सहभाग नसल्याचा दावा त्यांनी केला.

खा. संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत कोविड उपचार केंद्रातील गैरव्यवहाराबाबत मी केलेल्या आरोपांबाबत तसेच त्यांचे प्रवीण राऊत, सुजीत पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत एक शब्दही उच्चारला नाही, याकडेही डॉ. सोमय्या यांनी लक्ष वेधले.

तसेच मी त्यांची स्थिती समजू शकतो असेही ते म्हणाले.

 

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *