Breaking News

राऊतांच्या आरोपावर चंद्रकांत पाटील म्हणाले, पोकळ धमक्यांना घाबरत नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला

मराठी ई-बातम्या टीम  

मागील दोन-तीन दिवसांपासून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या कोठडीत भाजपाचे ते साडेतीन नेते जातील आणि अनिल देशमुख बाहेर येथील असे सांगत याबाबत आपण लवकरच पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे संजय राऊत नेमके भाजपाचे कोणत्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार याविषयीची उत्सकुता निर्माण झाली. त्या अनुषंगाने संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाचे नेते राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी कसे प्रयत्न करत आहेत याची माहिती देत फडणवीस सरकारच्या काळात २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले की, राऊतांची पत्रकार परिषद म्हणजे खोटा पहाड निकला चुहा अशी उपरोधिक टीका केली.

गेले काही दिवस फार मोठे काही तरी प्रकरण बाहेर काढणार असे वातावरण निर्माण करून शिवसेना खा. संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. पण खोदा पहाड निकला चूहा असे झाले. असे नुसते आरोप करण्याने काही होत नाही. पुरावे असतील तर तपासी यंत्रणांना द्या आणि त्यांनी काम केले नाही तर न्यायालयात जा. असल्या पोकळ धमक्यांना कोणी घाबरत नाही असा उपरोधिक टोला त्यांनी यावेळी संजय राऊत यांना लगावला.

या पत्रकार परिषदेसाठी खूप वातावरणनिर्मिती केली, पण गर्जेल तो पडेल काय, असे झाले. एखादा माणूस अडचणीत आला की, थयथयाट करतो, तसा प्रकार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत दिसल्याची टीकाही त्यांनी केली.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, असं म्हणणंच धाडसाचं ठरेल. कारण पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण होते, ते इथे नव्हतंच. त्यामुळे हा एकपात्री प्रयोग बघणाऱ्यांची चांगलीच करमणूक झाली असेल, असं म्हणतो. राजकारणात गती असलेल्यांच्या तर पोटात हसून हसून मुरडा आला असावा अशी खिल्ली उडवत आरोप झाले, तर निर्दोषत्व सिद्ध करण्याचे अनेक घटनादत्त अधिकार आणि मार्ग आहेत. ते राहिले बाजूला, आरोप करणाऱ्याचं अतिशय असभ्य भाषेत चारित्र्यहनन करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता. राऊत यांची भाषा राजकीय सभ्यतेत बसणारी नव्हती. याचसाठी शिवसेनेनं राऊतांपासून सुरक्षित अंतर राखलं असावे असेही ते म्हणाले.

शिवसेना भवनात राऊतांचा हा एकपात्री प्रयोग झाला, यापलीकडे यात शिवसेना कुठेच नव्हती. त्यामुळे राऊत मध्ये-मध्ये बाळासाहेब, शिवसेनेचं नाव ओढून-ताणून घेत होते. उद्धवजी तर दूरच, पण ज्या आदित्य ठाकरेंना पर्यावरणाचा हवाला देत प्रकल्पावर कारवाई करायला राऊतांनी सांगितलं, तेही तिथे नसावे? असा प्रश्न उपस्थित करत एकूणात केंद्रीय तपास यंत्रणांकडून ज्यांची चौकशी झाली, त्यांचं अरण्यरूदन असा हा प्रकार होता. प्रयोग आणखी ‘नबाबी’ होण्यासाठी तुम्ही मित्रांची मदत घ्यायला हवी होती. कदाचित, नाशिकसारख्या दूरच्या ठिकाणांहून माणसं जमवता-जमवता ही जमवा-जमव जमली नसावी. असो. संजय राऊत गेट वेल सून अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Check Also

विजय वडेट्टीवार यांच्या आरोपाला उज्वल निकम यांचे प्रत्युत्तर, माझ्या पोतडीत….

कसाब किंवा आतंकवाद हा पाकिस्तानमधून पसरवलेला नाही, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानने नाही, कसाबने निष्पाप लोकांचे बळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *