Breaking News

उध्दव ठाकरेंचे कारमध्ये उभे राहुन भाषण …भाजपा म्हणते कॉपी बहाद्दर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत टीका केली

शिवसेनेची स्थापना केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे हे अनेक ठिकाणी पक्षवाढीसाठी आपल्या कारने जात असत. तसेच त्या कारच्या बोनेटवर उभे राहून सभेला संबोधित करायचे. अगदी आज त्याचप्रमाणे उध्दव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण सटकल्यानंतर हजारो शिवसैनिक कालपासून मातोश्रीवर जात उध्दव ठाकरे यांना समर्थन देत आहेत. मात्र आज समर्थक शिवसैनिकांची संख्यापाहून उध्दव ठाकरे यांना मातोश्री बंगल्याबाहेर येत कारमध्ये उभे राहून शिवसैनिकांना संबोधित करावे लागले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या सभेची तुलना आजच्या उध्दव ठाकरेंच्या सभेशी करण्याची चर्चा रंगली.

मात्र या चर्चेवर भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत उध्दव ठाकरे यांना कॉपी बहाद्दर अशी टीका केली. तसेच गाडीवर उभं राहण्याची कॉपी करून काही होत नसतं. बाळासाहेब ठाकरेंनी दिवसरात्र मेहनत घेतली, कार्यकर्ता जपला, संघटना उभी केली, सत्तेवर शिवसैनिक बसवला. तर कॉपीबहाद्दर कधीही घराच्या बाहेर पडले नाहीत, कार्यकर्त्यांना भेटले नाहीत, उभी संघटना गमावली, विश्वासघाताने स्वतःच सत्तेवर बसले अशी तुलना करणारं ट्विट करत टीका केली. एका बाजूला कारच्या बॉनेटवर उभे असलेले बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे असा फोटोही ट्विट केला.

दरम्यान, दुपारी उध्दव ठाकरे यांनी कलानगर चौकात शिवसैनिकांशी संवाद साधताना म्हणाले, ज्या पद्धतीने आपले शिवसेना हे नाव चोराला दिले. आपला पवित्र धनुष्यबाण हा चोराला दिला. ज्यांनी धनुष्यबाण चोरला ते मर्द असतील तर त्यांनी चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत यावं. मी मशाल घेऊन तुमच्यासमोर उभा राहतो. बघुया काय होतं तर. धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो. रावणाने शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो उताणा पडला होता. तसेच हे चोर आणि चोरबाजाराचे मालक शिवधनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका केली. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना भाजपाने कॉपी बहाद्दर असं म्हटलं आहे.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *