Breaking News

अजित पवार यांचा पुण्यात सवाल, मी तर कोणाचं नावं घेतलं नाही, कोण संजय राऊत ? मग कोणाच्या अंगाला का लागावं...

ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेटीला गेल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी जोर आला होता. मात्र, माध्यमांसमोर येत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. मी पक्षातून बाहेर जाणार नसून जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. परंतु, त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही अजित पवारांच्या भूमिकेवर अनेकांकडून संशय व्यक्त करण्यात येतोय. तसंच, त्यांनी आपली बाजू मांडावी असं संजय राऊत यांनी म्हटलं. यावर अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राऊतांनी अजित पवार यांना दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितलं. तुम्ही स्पष्टीकरण दिल्यानंतरही संजय राऊत म्हणाले की, अजित पवार त्यांची बाजू मांडतील, असा सल्ला त्यांनी दिलाय, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना विचारला. हा प्रश्न येताच, अजित पवारांनी तात्काळ, कोण संजय राऊत? असा प्रतिसवाल केला. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत असं उत्तर पत्रकारांनी देताच, मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, मग कोणाच्या अंगाला का लागावं? असं सांगत अजित पवार यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.

अजित पवार म्हणाले की, कोण संजय राऊत? मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, मग कोणाच्या अंगाला का लागावं? मी माझ्या आणि पक्षापुरतं बोललो असे सांगत संजय राऊत यांच्याबाबत बोलण्याचे टाळले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *