Breaking News

नवाब मलिक यांना मिळालेले “ते” वानखेडे विषयीचे पत्र वाचण्यासाठी क्लिक कार ते पत्र पाठविले एनसीबी मुख्यालयाला

मुंबईः प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे यांच्याविषयी आरोपांची मालिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुरु केलेली असतानाच या प्रकरणातील एक पंच असलेल्या प्रभाकर सैल याने समीर वानखेडे आणि के.पी गोसावी यांनी खंडणीसाठी शाहरूख खान याच्यासोबत डील केल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर मलिक यांनीही वानखेडे हे मुळ मुस्लिम असताना त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवित ही नोकळी मिळविल्याचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली.
या पार्श्वभूमीवर एनसीबीतील एका कर्मचाऱ्याने समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईतील बहुतांश केसेसे कशा खोट्य़ा आहेत तसेच ड्रग्जचे रॅकेट तेच त्यांच्या विश्वासू साथीदारांच्या माध्यमातून कसे चालवितात याची माहिती देणारे एक नवाब मलिक यांना पोस्टाने पाठविल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.
त्यानुसार ते मिळालेले पत्र नवाब मलिक यांनी एनसीबीच्या मुख्यालयाला पाठविणार असल्याचे जाहिर केले त्यानुसार समीर वानखेडे यांच्या विषयीचे ते पत्र त्यांनी एनसीबीच्या केंद्रीय मुख्यलयाला आज पाठविले. ते पत्रच मराठी ई-बातम्यांच्या वाचकांसाठी खास देत आहोत…..

नवाब मलिक यांना मिळालेले हेच ते निनावी पत्र..

 

Check Also

यंदाच्या वर्षात फक्त २५ दिवस सुट्ट्या, ८ दिवसांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा तोटा राज्य सरकारकडून सुट्यांचे वेळापत्रक जाहीर-शनिवार-रविवारमुळे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम यंदाच्या वर्षभरात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शाळा-महाविद्यालये, यासह निमसरकारी संस्थांना २०२२ या आगामी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *