Breaking News

कबूल है, कबूल है, कबूल है…यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे? नवाब मलिकांचा मध्यरात्री आणखी एक वानखेडेंच्या विरोधात फोटो बॉम्ब

मुंबई: प्रतिनिधी

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या खऱ्या जातीवरून सध्या वादंग निर्माण झालेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या लग्नातील आणखी फोटो ट्विट करत आणखी एक माहिती पुढे आणली आहे. विशेष म्हणजे या फोटोत समीर वानखेडे यांच्या अर्धवट चेहरा दिसत असला तरी त्यांनी इस्लाम पध्दतीची गोल टोपी डोक्यावर परिधान केलेली असल्याची दिसून येत आहे. त्यामुळे वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आणखी एक पुरावा नवाब मलिक यांनी पुढे आणला आहे.

समीर वानखेडे हे जातीने मुस्लिम असून त्यांचा पहिला विवाह हा मुस्लिम पध्दतीने झाल्याबाबतचा निकाहनामा अर्थात लग्नाचे प्रमाण पत्रही नवाब मलिक यांनी यापूर्वीच जाहिर केले होते. मात्र त्यानंतर समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत त्यांचे स्वत: किंवा मुलाने मुस्लिम धर्म कधीच स्विकारला नसल्याचे आणि जातीने मागासवर्गीय असल्याचे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र जाहीर केले.

मात्र पत्नी ही मुस्लिम धर्मिय असल्याचे सांगत तीच्या इच्छेखातर समीरने मुस्लिम पध्दतीने लग्न केल्याचा दावा केला होता. तसेच समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनीही असाच दावा करत केवळ आईच्या इच्छेखातर समीरने पहिले लग्न मुस्लिम पध्दतीने केल्याचा दावा केला.

काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे याच्या दोन शाळांचे दाखले नवाब मलिक यांनी ट्विट करत त्यावर समीर वानखेडे याच्या शाळांच्या दाखल्यावर धर्माच्या रकान्यात मुस्लिम लिहिल्याचे उघडकीस आणले. त्यावेळीही सदर झालेल्या चुकीची १९८९ साली दुरूस्ती करण्यात आल्याची माहिती क्रांती रेडकर यांनी ट्विटद्वारे करत मलिक यांच्या आरोपाला प्रतित्युर दिले. तरीही त्यांचे मलिक यांच्या मुलींनी त्यावेळच्या लग्नाचे साक्षीदार असलेल्यांच्या सह्यांचे प्रमाणपत्रच ट्विट करत समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचे सिध्द करण्याचा प्रयत्न केला.

तर आज नवाब मलिक यांनी निकाहनाम्यावर समीर वानखेडे हे सही करतानाचा फोटो ट्विट करत ज्ञानदेव वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्या दाव्यातील फोलपणा उघडकीस आणला आहे. आता नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या या फोटोवर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर या काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे आहे.

 

Check Also

एनसीबी म्हणते, एसआयटी तपास करणार पण कोणाकडून केसेस काढल्या नाहीत ट्विट करत परिपत्रक जारी

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे साऊथ वेस्ट झोनलचे डेप्युटी डिजी मुथा अशोक जैन यांनी आर्यन खान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *