Breaking News

मुंबई

राज ठाकरे स्पष्टच म्हणाले, अजित पवार गेले ते शरद पवार यांच्या संमतीनेच…. महानगरपालिकेच्या निवडणूका घेऊन धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही

आगामी लोकसभा निवडणूकांना आता काही महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणे अपेक्षित होते. परंतु या निवडणूका काही होण्याची चिन्हे सध्या दिसत नाही. त्यातच भाजपाकडून काहीही करून लोकसभा निवडणूका जिंकायच्याच हा हेतू उराशी बाळगून राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट आणि मुळ भाजपा असे …

Read More »

आयएफएस अधिकारी प्रदिप वाहुले यांच्या निसर्गचित्र आणि कवितांचे प्रदर्शन उद्यापासून नेहरू आर्ट गॅलरी येथे प्रदर्शनाचे आयोजन

भारतीय वनसेवा अधिकारी-आयएफएस (IFS) प्रदिप वाहुले यांचे मुंबई येथील नेहरु आर्ट गॅलरी, वरळी येथे ‘The Meanderings’ निसर्गचित्र व कवितांचे प्रदर्शन १५ ऑगस्ट पासून आयोजित केले आहे. या मध्ये चित्र व शब्द यांचा सुरेख संगम साधल्यामुळे कलाप्रेमी साठी ही आनंदाची पर्वणी आहे. कलाक्षेत्रात कोणतेही औपचारिक शिक्षण न घेताही कलेची आवड आणि …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी ७५ व्हर्चुअल क्लासरूमचे उद्घाटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये ७५ व्हर्चुअल क्लासरूमचे १५ ऑगस्ट २०२३ रोजी दु. १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन होणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री …

Read More »

सुनिल तटकरे यांची माहिती, लोकसभानिहाय दौरा आणि मंत्र्यांचा प्रदेश कार्यालयात जनता दरबार राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालयात पार...

लोकसभानिहाय राज्याचा दौरा आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे व नऊ मंत्र्यांचा जनता दरबार राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राज्यात काम करणाऱ्या पदाधिकार्‍यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. …

Read More »

राज्यातील खेळाडूंना मिळणार वैद्यक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण क्रीडामंत्र्यांची जपानी शिष्टमंडळाशी चर्चा

पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. त्या विद्यापीठामध्ये जपानची मदत घेऊन राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्यकशास्त्र आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशिक्षण देण्यासंदर्भात क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जपानचे शिष्टमंडळ यांच्यात सविस्तर चर्चा झाली. मंत्री संजय बनसोडे यांची जपानच्या शिष्टमंडळाने अलीकडेच भेट घेतली. शिष्टमंडळात मुंबईचे कौन्सुल जनरल डॉ. फुकाहोरी …

Read More »

अखेर ईडीने विरोध न केल्याने नवाब मलिक यांना मिळाला जामीन सर्वोच्च न्यायालाने केला जामीन मंजूर

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज व्यापारातील गुन्हेगारांशी संबध असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याची बहिण असलेल्या हसिना पारकर हिच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी कुर्ला येथील गोववाला कंपाऊड येथील मालमत्ता स्वस्तात खरेदी केल्याचा आणि या मालमत्ता खरेदीतील पैसा …

Read More »

ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांविरूद्ध करा आता व्हॉट्सॲपवर तक्रार आरटीओने जारी केला व्हॉट्सअॅप नंबर आणि ई-मेल आयडी

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध तक्रार करायची असल्यास व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. त्यासाठी 9152240303 क्रमांक व [email protected] ईमेल आयडी प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) यांनी उपलब्ध करून दिला आहे. या कारवाई अंतर्गत ३१ जुलै पर्यंत परिवहन कार्यालयात एकूण १५४ …

Read More »

शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला

मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केले. माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्था …

Read More »

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीच्या तयारीचा घेतला आढावा ग्रँड हयात हॉटेलला भेट देऊन केली पाहणी

३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबई मध्ये होणार आहे. महाविकास आघाडी या बैठकीची संयोजक असून आज महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी वाकोला येथील ग्रँड हयात हॉटेलला भेट देऊन पाहणी केली व तयारीचा आढावा घेतला. यावेळी काँग्रेस …

Read More »

राज्यात पाळणाघर योजनेबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आश्वासन

पाळणाघर योजनेबाबत राज्य शासनाची नियमावली तयार करण्यासाठी तसेच ही योजना राबविताना शासकीय, अशासकीय संस्थांचेही मत विचारात घेण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण, कामगार, गृह आणि महिला व बालविकास विभागाची संयुक्त बैठक घेणार असून चौथ्या महिला धोरणात पाळणाघराबाबत निर्णयाचा समावेश करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. …

Read More »