Breaking News

आयएफएस अधिकारी प्रदिप वाहुले यांच्या निसर्गचित्र आणि कवितांचे प्रदर्शन उद्यापासून नेहरू आर्ट गॅलरी येथे प्रदर्शनाचे आयोजन

भारतीय वनसेवा अधिकारी-आयएफएस (IFS) प्रदिप वाहुले यांचे मुंबई येथील नेहरु आर्ट गॅलरी, वरळी येथे ‘The Meanderings’ निसर्गचित्र व कवितांचे प्रदर्शन १५ ऑगस्ट पासून आयोजित केले आहे. या मध्ये चित्र व शब्द यांचा सुरेख संगम साधल्यामुळे कलाप्रेमी साठी ही आनंदाची पर्वणी आहे.
कलाक्षेत्रात कोणतेही औपचारिक शिक्षण न घेताही कलेची आवड आणि अंगभुत मेहनतीच्या बळावर प्रदिप वाहुले यांनी चित्रविष्कार केला आहे. एकाच माध्यमात न स्थिरावता विविध माध्यमामध्ये कला साकारली आहे.

सेंट लारेन्स हायस्कूल, रुपारेल कॉलेज आणि इंस्टिट्यूट ऑफ सायन्स यांचे माजी विद्यार्थी असलेल्या प्रदीप वाहुले यांनी २००३ साली SIES कॉलेज, सायन येथे प्राणीशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कारकिर्द सुरु केली. त्यांचे कलेतील नैपुण्य पाहुन कॉलेजने त्यांना बैचलर ऑफ़ मास मिडिया विभागात विद्यार्थ्यांना फोटोग्राफीचे शिक्षण देण्यासाठी सुद्धा नियुक्त केले. २००९ साली त्यांची भारतीय वनसेवा (IFS) मध्ये निवड झाली. सध्या ते केंद्रीय अकादमी राज्य वन सेवा, देहरादून येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. वनअधिकारी म्हणून काम करत असताना त्यांच्या कलेला नैसर्गिक सौंदर्य दृष्टी लाभली. त्यांची अशी धारणा आहे की, निसर्गावर प्रेम हीच निसर्गसंवर्धनाची पुर्वअट आहे.

आतापर्यंत ललित कला अकादमी’दिल्ली, उदयपूर देहरादून, दिव, तवांग या ठिकाणी त्यांच्या कलाकृतीची प्रदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. ‘The Meanderings’ नावाचा सध्याचा संग्रह हा अतिशय उत्कृष्ठ आहे की तो आपल्याला जुन्या मास्टर्सच्या, विशेषतः युरोप आणि अमेरिकेच्या शास्त्रीय लँडस्केपशी जोडतो. या संग्रहात त्यांनी तैलचित्रांबरोबर ऍक्रेलिक, सॉफ्ट ड्राय पेस्टल, इंडियनइंक, वॉटर कलर या माध्यमांचा वापर केलेला आहे. सिमीत रंगछटांचा वापर करून रेखाटलेली चित्रे एक अद्वितीय आविष्कार ठरतात.

या साहित्यिक स्पर्शाने भरलेल्या चित्रांमध्ये एकाकित्वाच्या क्षणांचे अनुभव, आपुलकीचा स्पर्श, मनात साठलेल्या गतकालीन स्मृतींचे क्षण उभे राहतात. त्यांनी रेखाठलेली चित्रे व त्यास अनुसरून अश्या स्वरचित कविता या प्रकृतीच्या सौंदर्याबद्दल आणि त्याचा आपल्या जीवनावर व अस्तित्वावर असणारा प्रभाव स्पष्टपणे संवादित करतात. त्यांच्या प्रदर्शनाचे संपूर्ण व्यवस्थापन त्यांच्या पत्नी रश्मी राव वाहुले यांनी केले आहे, जे प्रतिमा सल्लागार आणि प्रेरक वक्ते आहेत. रश्मीने क्युरेट केलेले हे ९वे प्रदर्शन आहे. प्रदर्शन सर्व कलाप्रेमींसाठी २१ ऑगस्ट पर्यत सकाळी ११ ते सायं ७ या वेळेत खुले आहे.

Check Also

भारतीय निवडणूक प्रक्रियेचे चार देशांच्या परदेशी शिष्टमंडळाकडून कौतुक

भारतासारख्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रिया ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. येथील मतदारांचा स्वयंप्रेरीत मतदानासाठीचा उत्साह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *