Breaking News

मुंबई

शासकीय व गावठाण जमिनीवरील कातकरी व्यक्तींची अतिक्रमणे नियमानुकूल होणार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतची केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाण्यातील कातकरी कुटुंबांना दिलासा मिळणार असून कातकरी समाजाच्या हितासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात गावठाण जमिनीवरील कातकरी समाजाच्या घरठाणाबाबतची १ हजार ४३३ अतिक्रमणे, शासकीय जमिनीवरील …

Read More »

राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर ३१ ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

स्टेडियममध्ये ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेला बंदरे युवक व क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर, दहीहंडी समन्वय …

Read More »

भिक्षेकरी यांनाही मिळणार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

चेंबूर येथील शासकीय पुरुष आणि महिला भिक्षेकरीगृह आणि मानखुर्द येथील दि चिल्ड्रेन्स एड होम, मुले तसेच मुलींचे नवीन बालगृह , गतिमंद मुलांसाठीचे बालगृह, चिल्ड्रेन्स एड सोसायटीची प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अलीकडेच भेट देऊन तिथे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, अन्न-धान्याची गुणवत्ता, स्वयंपाकाच्या ठिकाणी …

Read More »

पाणी टंचाई : मुंबईच्या सात तलावात फक्त ८३ टक्के पाणी साठा ! पाणी जपून वापरण्याचे मुंबई महापालिकेचे आवाहन

83 percent water storage in seven lakes of Mumbai

मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी कोणताही प्रमुख तलाव सध्या ओव्हरफ्लो नाही. तसेच जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने मुंबईची पाण्याची चिंता मिटली असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही अशी माहिती महापालिकेच्या जलविभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी टंचाईची चिंता कायमच राहणार असल्याची शक्यता …

Read More »

राज्यातील शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात… निवडणूकीच्या तोंडावर मतदारांना पुन्हा खुष करण्याचा प्रयत्न

आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले “हे” महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित निवडणूकीच्या अनुषंगाने घेतले अनेक निर्णय

आगामी लोकसभा निवडणूका नजरेसमोर ठेवून महाराष्ट्रात आणि देशात अनेक लोकनियुक्त सरकारे पाडत भाजपा प्रणित सरकारे आणण्यात आली. त्यातच आता आणखी ८-९ महिन्यात लोकसभा निवडणूकांचे बिगूल वाजणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील मतदारांना खुष करण्याच्या अनुषंगाने राज्यात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निमित्ताने आदीवासी वाडे, …

Read More »

नाना पटोले यांची टोला, गृहमंत्री फडणवीसांनी पक्ष फोडण्यापेक्षा पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे तलाठी परिक्षा पेपर फुटीमागील सर्वांचा छडा लावा...

नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी भाजपाप्रणित राज्य सरकार खेळ खेळत आहे. नोकर भऱती प्रक्रियेत घोटाळा झाला नाही अशी एकही परिक्षा होत नाही. गुरुवारी तलाठी पदाच्या परिक्षेचा पेपर फुटला आणि लाखो तरुणांची निराशा केली. सरकारला परिक्षाही घेता येत नाहीत, सातत्याने पेपरफुटी होत आहे पण राज्य सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने …

Read More »

उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, उमेदवारांचा आग्रह धरू नका आपण… ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी सांगितले

राज्यातील आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्यादृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरु केले आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडूनही मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु केली असून आपल्या समर्थक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला लढायचे आहे. त्यामुळे उमेदवारांचा आग्रह धरू नका, पण त्याची तयारी ठेवा, असे आवाहन केले. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव …

Read More »

भारतरत्‍न अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या कवितांचा मराठी भावानुवाद पुस्‍तकरुपात मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या उपस्थितीत पुस्‍तकाची घोषणा

भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या कवितांचा मराठी भावानुवाद मराठीतील ख्‍यातनाम कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी केला असून त्‍याचे पुस्‍तक लवकरच प्रकाशि‍त करण्‍यात येईल, अशी घोषणा आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. भारतरत्‍न अटल बिहारी वाजपेयी यांची कविता मानवतेचा साक्षात्‍कार करणारी आहे, असे प्रतिपादन यावेळी कवी गीतकार प्रा. …

Read More »

‘अभंग एकविशी’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन 'अभंग एकविशी' पुस्तिकेच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे अंधश्रद्धा निर्मुलन, सर्वधर्मसमभावाचे, सत्यशोधक विचार सर्वांपर्यंत पोहोचतील - उपमुख्यमंत्री अजित पवार

जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपू्र्वी लिहिलेल्या अभंगातून २१ अभंग निवडून ते ‘अभंग एकविशी’ पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. ‘गाथा परिवार’ आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या संकल्पनेतून प्रकाशित ‘अभंग एकविशी-तुकोबारायांची’ पुस्तकामुळे संत तुकाराम महाराजांचे सत्यशोधक विचार सर्वांपर्यंत पोहचण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुस्तकाचे …

Read More »