Breaking News

राज्यातील शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात… निवडणूकीच्या तोंडावर मतदारांना पुन्हा खुष करण्याचा प्रयत्न

आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) व केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल. हा शिधा जिन्नस १९ सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त व त्यानंतर १२ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या दिवाळी निमित्त वितरित करण्यात येईल.

राज्यातील एकूण १ कोटी ६५ लाख ६० हजार २५६ शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. या खरेदीसाठी घाऊक बाजारातील दर व अनुषंगिक खर्चासह ८२७ कोटी ३५ लाख इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली. प्रती संच २३९ रुपये या दराने हा शिधा जिन्नस संच खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.

दरम्यान शिंदे सरकारने घेतलेला हा निर्णय हा लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने घेतला आहे असे बोलले जात आहे. कारण गौरी गणपती, दिवाळी सणानंतर अन्य काही धर्मियांचे मोठे सण येत आहे. त्यावेळीही असाच आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला खुष ठेवण्यासाठी आणि भाजपाच्या पारड्य़ात मताचे दान पडावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

नायगाव दादर येथे २२ व २३ फेब्रुवारीला ग्रंथोत्सवाचे आयोजन दिपक केसरकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मुंबई शहर व मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर पूर्व यांच्या संयुक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *