Breaking News

मुंबई

मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा निर्णयः नीति आयोगाच्या मदतीने मुंबईचा आर्थिक कायापालट मास्टर प्लॅन सादर करणार, राज्यातर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम, नोडल अधिकारी नेमणार

मुंबई महानगर प्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास व्हावा आणि या भागाचा जीडीपी ३०० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासंदर्भात नीती आयोगासमवेत आज बैठक झाली. राज्य शासन यामध्ये नीति आयोगाशी संपूर्ण समन्वय ठेवेल, वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र टीम यासाठी नेमण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आज मंत्रालयात नीति …

Read More »

पुणे येथील वीर धरणबाधितांसाठी प्रस्ताव सादर करा प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याचा प्रस्ताव आराखड्यासह सादर करावा

पुणे जिल्ह्यात नीरा नदीवर बांधण्यात आलेल्या वीर धरणामुळे बाधित झालेल्या खंडाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव संबंधित यंत्रणेने आराखड्यासह सादर करावा, तसेच राज्यातील याविषयीचे अन्य प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज येथे दिले. खंडाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याबाबत आयोजित बैठकीत …

Read More »

राज्यात जपानच्या धर्तीवर ऑलिम्पिक भवन उभारणार क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची घोषणा

खेळाडूंना जागतिकस्तरावर उत्तम कामगिरी करता यावी, यासाठी क्रीडा धोरणात बदल करणार असून, जपानच्या धर्तीवर राज्यात लवकरच ऑलिम्पिक भवन उभारणार असल्याची घोषणा क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी केली. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी (मुंबई शहर) यांच्यावतीने …

Read More »

आशिष शेलार यांचा सवाल, उद्धव ठाकरेंचा मातोश्री ३ चा प्लॅन आता चंद्रावर नाही ना….? हिंगोलीतील सभेतील उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर शेलारांचा पलटवार

पाकिस्तानने शुभेच्छा दिल्यानंतर चंद्रयान मोहिमेच्या शुभेच्छा आणि अभिनंदन उद्धवजी तुम्ही का केलं? त्या अगोदर तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन का केले नाही? अशी कुठली गोष्ट तुमच्या मनाला टोचत होती? जी भारताने कमावली, शास्त्रज्ञांनी मिळवली, जगाने पाहिली, पण मला नाही बरी वाटली अशी कुठली गोष्ट होती? तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं नाही? एक पत्र, …

Read More »

तीन वर्षाचे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ या तिघांना जाहिर क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०१९-२०,२०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचे पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते २८ ऑगस्ट रोजी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, येथे सायंकाळी पाच वाजता प्रदान करण्यात येणार आहेत. हा पुरस्कार प्रदान …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, जपानच्या गुंतवणूकदारांकडून मोठ्या गुंतवणूकीची शक्यता मला देण्यात आलेली मानद डॉक्टरेट पदवी महाराष्ट्राचा गौरव

जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून जपान दौऱ्यावर गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत आगमन झाले. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आगमनानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जपानच्या या दौऱ्यात जपान सरकारचे मंत्री, पंतप्रधानाचे सल्लागार, विविध कंपन्या, अधिकारी, प्रांतांचे …

Read More »

शैक्षणिक आराखडा लवकर तयार होण्यासाठी सदस्यांनी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्याचा शैक्षणिक आराखडा तयार करण्यासाठी सुकाणू समिती गठित करण्यात आली आहे. त्याचा एक भाग म्हणून पायाभूत स्तरावरील (अंगणवाडी/ बालवाडीची तीन वर्षे आणि इयत्ता पहिली व दुसरी) आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञांची उपसमिती तयार करण्यात आली आहे. या उपसमितीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुकाणू समितीच्या …

Read More »

चाकरमान्यांना गणपती बाप्पा पावणार १ सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून दर दिवशी कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली. गेली अनेक महिने चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित …

Read More »

दुबई फेस्टीवलच्या धर्तीवर मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सव उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापणार फाऊंडेशन-पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांची माहिती

शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी ‘दुबई शॉपिंग फेस्टीव्हल’च्या धर्तीवर ‍२० ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबई व उपनगरातील विविध विभागात ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन वाढीस चालना मिळणार असल्याचे पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. या महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

पैलवानांच्या आरोग्य विम्यासाठी रूस्तुम -ए-हिंद अमोल बुचडे यांचा पुढाकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत केली आरोग्य विम्याची मागणी

महाराष्ट्रात शहरापासून गाव – खेड्यापर्यंत कुस्ती हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. यामध्ये प्रामुख्याने फ्री स्टाईल, ग्रीको रोमन, पारंपारिक मातीतील कुस्ती, महिला कुस्ती आणि सुमो कुस्ती अशा वेगवेगळ्या प्रकारात शालेय कुस्ती स्पर्धा, अनेकविध खेळ संघटना आयोजित कुस्ती स्पर्धा, निमंत्रित कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी सारखी वरिष्ठ गटातील मानाची स्पर्धा यामध्ये मोठ्या …

Read More »