Breaking News

मुंबई

कोरोना काळात महापालिकेच्या खिचडी वाटपात कोट्यवधींचा भ्रष्टाचार खा. संजय राऊत यांच्या नातलगांना झाला लाभ -भाजपा नेते माजी खा. डॉ. किरीट सोमैया यांचा आरोप

कोरोना काळात मुंबई महापालिकेने स्थलांतरीत कामगारांना खिचडी देण्यासाठी राबविलेल्या योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असून खा. संजय राऊत यांची कन्या, भाऊ तसेच निकटवर्तीयांना या भ्रष्टाचारात लाखो रुपयांचा लाभ झाला आहे , असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खा. डॉ . किरीट सोमैया यांनी शुक्रवारी केला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात …

Read More »

मुंबईच्या दहिहंडीत मान्सूनची हजेरी, उत्सवात ३५ जण जखमी बहुतांष मंडळाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी

मुंबईसह राज्यात कृष्णाजन्मष्टीचा आनंद आज दहिहंडीच्या रूपात जल्लोषात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी मागील काही महिन्यापासून गायब झालेल्या मान्सूनच्या पावसाने आज हजरी लावत गोविंदाच्या उत्साहात भर घातली. त्यामुळे गोविंदाच्या उत्साहाला पारावार राहिला नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध मंडळांच्या दहिहंडी उत्सवात जवळपास ३५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे. …

Read More »

मुंबई विद्यापीठात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ ज्युरिस्ट’ कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिली प्रारंभाचा शताब्दी सोहळा

मुंबई विद्यापीठाचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथील ‘ग्रेज इन’ या संस्थेतून प्राप्त केलेल्या बॅरिस्टर या सर्वोच्च पदवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाची वकिलीची सनद प्राप्त करून ५ जुलै १९२३ रोजी वकिलीस प्रारंभ केला. या ऐतिहासिक घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या …

Read More »

मेट्रो, मुंबई, मुद्रांक शुल्कच्या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळात घेतले हे महात्वाचे निर्णय मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडातील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत

मेट्रो प्रकल्पांना ब्रीज लोन घेण्याबाबत उच्चाधिकार समिती मेट्रो कारशेडसाठी ठाण्यातील मोघरपाडा येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्याचा त्याचप्रमाणे राज्यातील मेट्रो प्रकल्पांना ब्रीज लोन साठी शासन हमी देण्यासंदर्भात निर्णय घेण्याकरिता उच्चाधिकार समिती नेमण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मुंबई मेट्रो टप्पा-4, 4अ, 10 आणि …

Read More »

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यपालांनी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना समज द्या… तर लाठिमार प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची अंबादास दानवे यांची मागणी

सरकारी कार्यक्रमासाठी लाठीचार्ज झाला. आम्ही अडीच वर्षे सरकारमध्ये होतो. त्यामुळे पोलिस स्वताहून लाठीचार्ज करत नाहीत. मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांकडून आदेश आल्याशिवाय पोलिसांकडून काम केले जात नाही. तरीही शांततेत मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठिमार करण्यात आला. हा लाठिमार गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरच करण्यात आल्याने राज्यपालांनी घटनाबाह्य मुंख्यमंत्र्यांना समज द्यावी अशी मागणी …

Read More »

येरवडा आणि हवेली येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करावेत- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यातील येरवडा येथे मान्यता देण्यात आलेल्या नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि हवेली येथील शासकीय औद्योगिक संस्थांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पुणे येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त ठरणारे व्यावसायिक अभ्यासक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सुरू करावेत, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यानी दिली. मंत्रालय …

Read More »

सिल्व्हर पॉम्फ्रेट (पापलेट) राज्य मासा घोषित पशुपालकांसह मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्डमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी-केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला

देशातील पशुपालक आणि मच्छिमार यांना किसान क्रेडिट कार्डचे वितरण अधिक सुलभतेने व्हावे यासाठी बॅंकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा. कारण यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांनी केले. दरम्यान, राष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून सिल्व्हर पॉम्फ्रेट (पापलेट ) मासा हा राज्य मासा म्हणून जाहीर …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दहीहंडी- गणेशोत्सव जल्लोषात साजरे करा सण - उत्सव शांततेने साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे

आगामी दहीहंडी, गणेशोत्सव उत्साहाने, शांततेने जल्लोषात साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. राज्यातील सर्व आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्यासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करावी. समाज प्रबोधनाचा संदेश देतानाच पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे दहीहंडी …

Read More »

एकल नव्हे एकत्रित कुटुंब हवे! कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठाणचा ५ वा वर्धापनदिन उत्सहात साजरा

अंतर्गत मतभेदामुळे सध्या एकल कुटुंब पद्धत वाढल्याने जनरेशन गॅप वाढत आहे. परंतु मुलांची जडण- घडण, त्यांच्यावर संस्कार होण्यास एकत्रित कुटुंब पद्धत गरजेची असल्याचे प्रतिपादन कोकण विभाग म्हादे परिवार संलग्न कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रदिप म्हादे यांनी केले. रविवारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन आणि स्नेह मेळावा दिवा येथील शिवलिला अपार्टमेंट मोठ्या …

Read More »

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दिवट्या… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑफिशियल एक्स एकाऊंटवरून ट्विट

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा कार्ती चिदंबरमने केली असल्याची टीका राज्याचे …

Read More »