Breaking News

मुंबईच्या दहिहंडीत मान्सूनची हजेरी, उत्सवात ३५ जण जखमी बहुतांष मंडळाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी

मुंबईसह राज्यात कृष्णाजन्मष्टीचा आनंद आज दहिहंडीच्या रूपात जल्लोषात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी मागील काही महिन्यापासून गायब झालेल्या मान्सूनच्या पावसाने आज हजरी लावत गोविंदाच्या उत्साहात भर घातली. त्यामुळे गोविंदाच्या उत्साहाला पारावार राहिला नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध मंडळांच्या दहिहंडी उत्सवात जवळपास ३५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे.

यंदाच्या वर्षी कोरोनाचे कोणतेच नियम नसल्याने यंदाचा दहिहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. त्यातच नेहमीच्या परांपरागत दहिहंडी मंडळांनी ठाणे, मुंबई, घाटकोपर, कल्याण-डोंबिवली आदी ठिकाणी मोठे उत्सव आयोजित करण्यात आले. प्रथेनुसार अनेक गोविंदा मंडळानी या मोठ्या मंडळाच्या दहिहंडी उत्सवात सलामी दिली. या सलामी देण्याच्या पध्दतीतच अचानक मानवी थर कोसळल्याने अनेक गोविंदा जखमी झाले. जखमी झालेल्या गोविंदाना तातडीने उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, अनेक दहिहंडी मंडळांनी उत्सवाच्या ठिकाणी डॉक्टरांची पथके आणि रूग्णवाहिकांची तजवीज करून ठेवली होती. एखादा गोविंदा गंभीररित्या जखमी झाल्यास त्याला रूग्णालयात दाखल करण्यात येत होते. तर जे कोणी किरकोळ जखमी झाले त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येत होते.

याशिवाय, दहिहंडी उत्सवात आपलाही सहभाग नोंदविण्यासाठी मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक तारक-तारका आवर्जून उपस्थित राहिले होते. मात्र यावेळी डान्सर गौतमी पाटील हिची जादू गोविंदा मंडळांवर आणि गोविंदावर असल्याचे दिसून आले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विनोद घोसाळकर यांचे प्रतिपादन, अभिषेकला विश्वासघाताने संपवले…

माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *