Breaking News

तीन वर्षाचे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ या तिघांना जाहिर क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०१९-२०,२०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचे पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते २८ ऑगस्ट रोजी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, येथे सायंकाळी पाच वाजता प्रदान करण्यात येणार आहेत.

हा पुरस्कार प्रदान सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतीत संपन्न होणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

मंत्री बनसोडे म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, तसेच क्रिडापट्टूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या सोहळयात तीन वर्षांचे एकूण ११९ पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार (सन २०१९-२० ) श्रीकांत शरदचंद्र वाड (ठाणे) यांना, (सन २०२०-२१) दिलीप बळवंत वेंगसरकर आणि (सन २०२१-२२) आदिल जहांगिर सुमारीवाला, (मुंबई) यांना प्रदान करण्यात येणार असून विविध क्रीडा प्रकारात प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे मंत्री बनसोडे यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील , विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विनोद घोसाळकर यांचे प्रतिपादन, अभिषेकला विश्वासघाताने संपवले…

माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *