राज्यात सध्या निवडणूकांचे वारे वहात आहेत. तसेच शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षसंघटनेच्या बांधणीच्या निमित्ताने सध्या मराठवाडा दौऱ्याच्या निमित्ताने हिंगोली येथे आलेले शिवसेना ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर टीकास्त्र सोडले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका करताना म्हणाले, सध्या बाहेरचे लोक राज्याच्या दौऱ्यावर सारखेच येत आहेत. आणि सतत सांगत आहेत की आमचं डबल इंजिनचं सरकार आहे. आता इतके कमी की काय म्हणून या डबल इंजिनच्या सरकारला आणखी एक डबा जोडलाय तो डबा म्हणजे अजित पवार यांचा जोडलाय. काहीही करून फक्त सत्ता मिळवायची आणि ती राखण्यासाठी नुसते हे पक्ष तो फोड इतकेच काम सध्या भाजपाकडून सुरु असल्याची टीका केली.
तसेच उद्धव ठाकरे म्हणाले, यांना मत मागायची होती तेव्हा आमचा बाप चोरला. मग तुमच्या दिल्लीच्या बापात हिंमत नाही का त्यांच्या नावावर मतं मागायला अशी खोचक टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, मत मागण्यासाठी दुसऱ्याचा बाप चोरायचा आणि सत्ता राखायला दुसऱ्या पक्षातील नेते घ्यायचे अशी टीकाही भाजपावर केली.
सध्या राज्यातील सरकार हे एक कार्यक्रम करतंय ते म्हणजे शासन आपल्या दारी आणि थापा मारतय भारी अशीच अवस्था आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करत ते पुढे म्हणाले, तुमच्या योजना काय आहेत हे तरी तुमच्या घरच्यांना माहित आहेत का असा सवाल करत आधी तुमच्या घरतल्या लोकांपर्यंत या योजनांची माहिती द्या त्यानंतर जनतेच्या दारात जा असा टोला लगावत शासन आपल्या दारी साऱ्या योजना कागदावरी अशी खोचक टीका शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर केली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले, मी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणार होतो. पण आता त्यांच्यावर काहीही बोलणार नाही. नाही तर उगास बोभाटा होतो असे सांगत मागच्या वेळी मी फडतूस म्हणालो, थापाड्या म्हणालो पण बोभाटा झाला असे जाहिर सभेत म्हंटल्यानंतर सभेतून टरबूज, टरबूज असा आवाज प्रेक्षकांमधून आला, तोच धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले, अरे टरबूजाच्या झाडालाही रोज पाणी घालावं लागतं असा उपरोधिक टोलाही फडणवीस यांना लगावला.
यावेळी परभणीचे आमदार संतोष बांगर आणि वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यावर उद्धव ठाकरे टीकास्त्र सोडताना म्हणाले, तुम्ही सगळे शेतकरी आहात त्यामुळे पायात साप आल्यानंतर काय करायचं ते तुम्हाला चांगलं माहित आहे असे सांगत त्या को तिकडे पलिकडच्या एक खासदार आहेत मागच्या वर्षी त्यांचा एकटीचाच राखी बांधतानाचा फोटो छापून आला होता. राखी बांधा अन् घोटाळे दडवा असा प्रकार सध्या सुरु असल्याची टीका करत पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जर खरंच हिंमत असेल तर तुमच्या पावडरने स्वच्छ झालेल्या मेहबुबा मुफ्ती आणि गुजरातच्या बिल्कीस बानो यांच्याकडून राखी बांधून घेऊन सण साजरा करा असे आव्हान दिले.
यावेळी राम मंदीराच्या उद्घाटनाच्या दिवशी देशभरातून सर्व हिंदूना बोलवायचे आणि गेल्यावेळी झाली तशी पुन्हा दंगल घ़डवून आणायचा कट भाजपाने सत्तेसाठी आखला असल्याचा गंभीर आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.
#हिंगोली । प्रमुख मार्गदर्शक – पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे । निर्धार सभा – #LIVE https://t.co/UrNEi5JmD1
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) August 27, 2023