Breaking News

दलित मुलांना मारहाण प्रकरण, शासन नेमकं कोणाच्या दारी ? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा शिंदे-फडवीस-पवार यांना सवाल

शेळी कबुतरे चोरल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलित आणि एक मराठा मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेचा तीव्र निषेध विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी करत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आहे, गृहमंत्री सुद्धा भाजपाचे आहे. ते स्वतः दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देतील की हे प्रकरण सुद्धा इतर प्रकरणांप्रमाने दाबण्यात येईल ? असा सवाल केला.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, दलित, ओबीसी, आदिवासी भाजपामध्ये वापरासाठी आहेत. त्यांना वापरा आणि फेका अशी भाजपाची भूमिका आहे अशी टीकाही शिंदे-फडणवीस-पवार यांच्या सरकारवर केली.

तसेच विजय वडेट्टीवार म्हणाले, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आपल्या राज्यातील अश्या घटनांकडे डोळेझाक करून जपानमध्ये मोठं मोठे वल्गना करतात. इकडे त्यांच्याच राज्यात समाज मन संतप्त करणाऱ्या अश्या दुःखद घटना घडत आहेत. या घटना राज्यातील कायदा व सुव्यस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत अशी चिंताही उपस्थित केली.

यावेळी ट्विट करत विजय वडेट्टीवार म्हणाले, या घृणास्पद कृत्याला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरीत आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत अशा घटनांचा केवळ निषेध करणे पुरेसे नाही; गरज आहे ती गुन्हेगारांना शिक्षा देण्याची अशी मागणी करत शासन नेमकं कुणाच्या दारी असा सवालही केला.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *