Breaking News
Medical Expense

Medical Expense : वैद्यकीय उपचारांचा खर्च ५ वर्षात झाला दुप्पट… महागाईत दरवर्षी १४% दराने वाढ

एक तर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढला आहे. तसेच कोविड काळापासून रुग्णालयातील उपचारही महाग झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत कोणत्याही आजारामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर Medical Expense  उपचारांवर होणारा खर्च दुपटीने वाढला आहे.संसर्गजन्य रोग आणि श्वसनविकारांवर उपचारासाठी विम्याचे दावे झपाट्याने वाढले आहेत.

एकीकडे महागाई दर ७ टक्क्यांच्या आसपास असताना वैद्यकीय महागाई १४ टक्क्यांहून अधिक वेगाने वाढत आहे.पॉलिसीबाजारच्या डेटाचा हवाला देऊन ऊध्घ् अहवालात असे सांगण्यात आले आहे की, संसर्गजन्य  रोगांच्या उपचारांसाठी २०१८ मध्ये सरासरी वैद्यकीय विमा दावा २४,५६९ रुपये होता.जो २०२२ मध्ये वाढून ६४,१३५ रुपये झाला आहे.

म्हणजेच ५ वर्षात या आजारावरील उपचारावरील खर्च १६० टक्के महाग झाला आहे.

मुंबईसारख्या मेगासिटीमध्ये पाच वर्षांत हा खर्च ३०,००० रुपयांवरून ८०,००० रुपयांपर्यंत वाढला आहे.श्वसनविकार आजारांवर उपचारासाठी सरासरी दावा २०२२ मध्ये ९४,२४५ रुपयांपर्यंत वाढला आहे, जो २०१८ मध्ये ४८,४५२ रुपये होता, याचा अर्थ वार्षिक उपचार १८ टक्के दराने महाग झाला आहे.

मुंबईत हा खर्च ८०,००० रुपयांवरून १.७० लाख रुपयांपर्यंत वाढला आहे.कोरोनानंतर वैद्यकीय उपचारावरील खर्चात वाढ झाली आहे. Medical Expense उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या साहित्यावरचा खर्चही वाढला आहे. पूर्वी या साहित्याचा एकूण बिलात हिस्सा ३ ते ४ टक्के असायचा, तो आता १५ टक्के झाला आहे.वैद्यकीय महागाई इतर महागाईच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. ७ टक्के महागाई दर आहे पण वैद्यकीय महागाई दुप्पट दराने वाढत आहे. आरोग्य विम्याची मागणी वाढल्याने उपचारही महाग झाले आहेत.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे आंदोलन मागे

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी व अधिका-यांच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *