Breaking News
ISRO thanked the Prime Minister

ISRO : इस्रोने मानले पंतप्रधानांचे आभार… पंतप्रधान मोदींकडून चांद्रयान -३ च्या नायकांचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ISRO इस्रोच्या शास्रज्ञांची भेट घेतल्यानंतर इस्रोने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. भारताची महत्त्वकांक्षी मोहीम असलेल्या चांद्रयान -३ चे सॉफ्ट लँडींग यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर करण्यात आले.

त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा दक्षिण आप्रिâका आणि ग्रीसचा दौरा आटोपल्यानंतर थेट बंगळूरु गाठलं. त्यानंतर त्यांनी बंगळूरुमध्ये इस्रोच्या शास्रज्ञांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ISRO इस्रोचं अगदी तोंडभरुन कौतूक केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी इस्रोच्या शास्रज्ञांची भेट घेतल्याची ट्वीट करत माहिती दिली. यावेळी त्यांनी म्हटलं की, बंगळुरुमध्ये मी शास्रज्ञांशी संवाद साधला. चांद्रयान-३ चं यश हे भारतासाच्या अंतराळ क्षेत्रामधील एक ऐतिहासिक क्षण होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी चांद्रयान-३ विषयी सविस्तर माहिती देखील जाणून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट करत इस्रोने आभार मानले आहेत. यावेळी बोलताना इस्रोने म्हटलं आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. पंतप्रधान मोदी हे ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आप्रिâकेच्या दौर्‍यावर गेले होते.

त्यानंतर ते एकदिवसीय ग्रीसच्या दौर्‍यावर देखील गेले होते. ग्रीसवरुन पंतप्रधानांनी थेट बंगळूरु गाठलं. इस्रोच्या कमांड सेंटरवर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी पंतप्रधान मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या प्रमुखांची पाठ देखील थोपटली. तसेच यावेळी त्यांनी मोहीम फत्ते झाल्याबद्दल पंतप्रधानांनी शुभेच्छा देखील दिल्या आणि शास्रज्ञांसोबत फोटो देखील काढला.

 

पंतप्रधान मोदींनी देशवासियांशी देखील संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी काही महत्त्वाच्या घोषणा देखील केल्या. यापुढे २३ ऑगस्ट हा दिन राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच चांद्रयान-२ ज्या जागी क्रॅश झालं त्या जागेला तिरंगा असं नाव देण्यात आलं आहे. तर चांद्रयान-३ ज्या ठिकाणी लँड झालं त्या ठिकाणाला ‘शिवशक्ती’ हे नाव देण्यात आलं आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *