Breaking News

सुनिल तटकरे यांची माहिती, लोकसभानिहाय दौरा आणि मंत्र्यांचा प्रदेश कार्यालयात जनता दरबार राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालयात पार...

लोकसभानिहाय राज्याचा दौरा आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे व नऊ मंत्र्यांचा जनता दरबार राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यात काम करणाऱ्या पदाधिकार्‍यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्यव्यापी उभे राहणारे संघटन अशा वेगवेगळ्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुढच्या आठवड्यात बोलवणार आहे. आणि त्यानंतर पक्षाच्या कामाची व संघटनेची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने एक कालबद्ध कार्यक्रम ठेवणार आहोत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

लोकसभानिहाय राज्याचा दौरा केला जाणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे करण्याबाबतही चर्चा झाली.

याशिवाय राज्यात आमचे ९ मंत्री असून त्यांचा जनता दरबारसुध्दा राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पुढच्या आठवड्यात सुरु करण्यात येतील असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

Check Also

घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेतील जखमींना अडीच लाखापर्यंतचे आर्थिक सहकार्य

वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांनात पालकमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *