Breaking News

नवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या एमएमआरडीएच्या आयुक्त पदी श्रीनिवास तर गृहनिर्माण सचिव पदी म्हैसकर

मुंबई: प्रतिनिधी

कोरोना काळात बदल्या न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु एमएमआरडीए आयुक्त ए.राजीव हे निवृत्त झाल्याने त्यांच्या ठिकाणी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव पदी वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याचबरोबर आयएएस अधिकारी लोकेश चंद्रा, प्रधान सचिव र.व का. यांची नियुक्ती महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई पदावर करण्यात आली आहे. तर विकास चंद्र रस्तोगी यांची नियुक्ती प्रधान सचिव (र.व का.), सामान्य प्रशासन विभाग पदावर करण्यात आली असून

सिकॉमचे व्यवस्थापकिय संचालक बी वेणुगोपाल रेड्डी यांची नियुक्ती प्रधान सचिव वने या पदावर करण्यात आली आहे. सुमंत भांगे, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ यांची नियुक्ती सचिव,सा.वि.स. आणि वि.चौ.अ.(2) या पदावर करण्यात आली असून यासंबधीचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून जारी देण्यात आले.

तर संध्याकाळी उशीरा आयएएस अधिकारी श्रीकर परदेशी यांची सिकॉमच्या व्यवस्थापकिय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. तर गोंदियाचे जिल्हाधिकारी दिपककुमार मीना यांची बहुजन कल्याण आणि ओबीसी विभागाच्या उपसचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान, एमएमआरडीएचे नवनियुक्त आयुक्त तथा गृहनिर्माण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव एस.व्ही.ए. श्रीनिवास यांनी गृहनिर्माण विभागात असताना मंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीतील माहिती किंवा गृहनिर्माण विभागाच्या धोरणात्मक बाबी कधीही कनिष्ठ अधिकाऱ्यांशी शेअर करत नव्हते. तसेच अनेक फाईलींवर परस्पर निर्णय घेवून फाईली पाठवित असत. त्यामुळे गृहनिर्माण विभागातील अनेक अधिकाऱ्यांना विभागात बसून काय काम करायचे याचा अंदाजच येत नव्हता. आता याच पध्दतीचे काम श्रीनिवास हे एमएमआरडीएत करणार की त्यात पुन्हा नाविन्य आणणार याबाबतचे उत्तर आगामी काळात मिळणार आहे. विशेष म्हणजे एमएमआरडीएमध्ये श्रीनिवास हे यापूर्वी अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केलेले आहे. त्यात आता ते आयुक्त म्हणून जात असल्याने त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीमुळे एमएमआरडीए पुन्हा आपल्या प्रकल्पात पुढाकार घेणार कि मागे राहणार याचेही उत्तर आगामी काळात मिळेल.

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *