Breaking News

जान शेखला कोटा येथे अटक, पण त्याच्याजवळ काहीही सापडलं नाही एटीएसप्रमुख विनीत अग्रवाल यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

जान शेख ९ सप्टेंबरला जाण्याचे नियोजित केले होते. त्याच्या खात्यावर १० तारखेला पैसे ट्रान्सफर केले. सुरुवातीला त्याचे तिकीट कनफर्म होत नव्हते. त्यानंतर त्याने १३ तारखेचे रिझर्व्हेरेशन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ट्रेनला कमी वेटींग लिस्ट असल्याने ते घेतले. या गाडीच्या रिझर्व्हेशन यातीत त्याचे सहा नंबरला नाव आहे. संध्याकाळी त्याचे तिकीट कन्फर्म झाले. तो मुंबई सेंट्रलहून एकटा निजामुद्दीमच्या दिशेला रवाना झाला. प्रवासादरम्यान तो कोटा येथे जेव्हा पोहोचला तेव्हा त्याला अटक करण्यात आले. त्याच्याजवळ हत्यारे किंवा स्फोटके मिळाली नाहीत. याबाबतची सर्व माहिती दिल्ली पोलिसांकडे आहे. आमची एक टीम आज संध्याकाळी जाणार आहे. दिल्ली पोलिसांकडे असणारी माहिती घेऊन येणार असून आमच्याकडे जी माहिती आहे ती आम्ही दिल्ली पोलिसांना देणार आहे. त्यानंतर ही केस पुढे कशी जातेय ते बघू असेही अशी माहिती एटीएसप्रमुख विनीत अग्रवाल यांनी दिली.

दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याच्या संशयावरून सहा लोकांना अटक केली आहे. त्यापैकी एक हा मुंबईच्या धारावीतला आहे. त्याचं नाव जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असून त्याचं पाकिस्तानातील डी कंपनीसोबत संबंध असल्याबद्दलचे अनेक रेकॉर्ड आहेत. जवळपास २० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आहे. आमच्या नजरेत तो होताच. पण दहशतवाद्याच्या कटाबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती. ती सेंट्रल एजन्सीकडे होती. त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांना दिली गेल्याचे त्यांनी सांगितले.

१००० हजार लोक आमच्या रडारवर आहेत. आम्ही सतत दिल्ली पोलिसांच्या संपर्कात आहोत. मुंबईत रेकी केली नव्हती, मुंबईमध्ये रेकी केली जाईल, असा अंदाज होता. तसेच याप्रकरणी आमच्याकडे जी काही माहिती आहे ती आम्ही दिल्ली पोलिसांना देऊ. अजून आम्हाला एफआयआर मिळालेला नाही. तो आल्यावर कारवाईचं ठरवू, असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय एकही दहशतवादी किंवा त्यांचा साथीदार मुंबईत आला नाही. सण-उत्सवांचा कालावधी त्यांच्या निशाण्यावर होता. अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांनी सांगितले, की गर्दी असलेल्या प्रत्येक भागात हल्ला करण्याचे त्यांचे लक्ष्य होते. त्यांनी या संदर्भात अनेक ठिकाणी रेकी केली होती, तर अनेक ठिकाणी त्यांना रेकी करणे बाकी होते. यामध्ये मुंबईतील वर्दळीची ठिकाणं, लोकल ट्रेन, मोठी मंदिरे, तसेच उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमधील मोठ्या मैदानाचा समावेश असल्याचं बोललं जाते. गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, रामलीला आणि निवडणूक सभा होणाऱ्या मोठ्या मैदानांचा यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

मंत्रालय मधील कर्मचाऱ्यांना, सहायक कक्ष अधिकारी होण्याची संधी मर्यादित विभागीय परीक्षा पात्रतेची अधिसूचना जारी

मंत्रालय मधील विभागातील सहायक कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी सहायक कक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published.