Breaking News

इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाच्या ७६३ कोटींच्या खर्चास मान्यता एमएमआरडीएच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील नियोजित स्मारकाचे काम लवकरच सुरु होण्याची चिन्हे असून या स्मारकाच्या सुधारीत ७६३.०५ कोटी रूपयांच्या सुधारीत अंदाजित खर्चास एमएमआरडीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या निर्णयाबरोबरच मेट्रो रेल्वेच्या वडाळा ते कासारवडवली या मार्गाच्या विस्तारास अर्थात कासारवडवली ते गायमुख या मेट्रो ४ या मार्गास मंजुरीही देण्यात आली असून त्या विषयीचा प्रस्ताव लवकरच कँबिनेट मंत्रिमंडळाकडे मंजूरीस पाठविण्यात येणार आहे. याशिवाय सर्व मेट्रोच्या कामांचा शुमारंभ २०१८ पर्यत कामे सुरु करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

वडाळा येथील अधिसूचित क्षेत्रात मल्टिमॉडेल वाहतुकीवर आधारित विकास संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामुळे रहिवासीबरोबरच वाणिज्यिक व करमणुकीचे केंद्र उभारणीस मदत होणार आहे. या केंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

त्याचबरोबर मेट्रो रेल्वेसाठी लागणारे डब्ब्यांची निर्मिती महाराष्ट्रात व्हावी यासाठी मेट्रो डब्ब्यांची निर्मिती करणाऱ्या उत्पादक कंपन्यांसोबत बोलणी करण्यात यावी असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

मुंबई शहराला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ८ वरील वसई – भाईंदर खाडीवरील पुलाच्या अनुषंगाने यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच या पुलाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी जुलैपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून कामाचे आदेश देण्यात यावेत असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी मेट्रो मार्ग 2 ब च्या मंडाले येथील डेपोच्या सुधारित किंमतीस प्रशासकीय मान्यता, बांद्रा- कुर्ला संकुलातील जी ब्लॉकमधील बांधकाम सुरू आहे किंवा व्हायचे आहे अशा वाणिज्यिक भूखंडावर एकूण वाणिज्य वापराच्या क्षेत्राच्या ३० टक्केपर्यंत रहिवासी वापर करणे, मेरिटाईम बोर्डास दिलेल्या भूखंडाचा वापर शासकीय व खासगी वापरास परवानगी देणे, वडाळा येथील अधिसूचित क्षेत्राचा विकास करण्यासाठी क्षेत्रातील आणिक बेस्ट आगार व माहूल खाडी जवळील भूखंडासह सुधारित नियोजन प्रस्तावास व विकास नियंत्रण नियमावलीस तत्वतः मंजुरी देण्यात आली.

याशिवाय संत गाडगे महाराज चौक-वडाळ-चेंबूर मोनोरेल मार्गाच्या सुधारित प्रवास भाडेदरास मान्यता आदी विविध विषयांनाही याबैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली.

 

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *