Breaking News

शीना बोरा प्रकरण; इंद्राणी मुखर्जीला साडेसहा वर्षानंतर जामीन सर्वोच्च न्यायालयाने केला मंजूर

प्रसिध्द अशा शीना बोरा हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जी या गेल्या साडे सहा वर्षांपासून कारागृहात आहेत. आतापर्यंत त्यांचा अनेकदा केलेला जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. मात्र आज अखेर सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जी यांचा जामीन अर्ज मंजूर केला.
शीना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. इंद्राणी तेव्हापासून मुंबईतील भायखळा कारागृहात आहे. यापूर्वी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अनेकदा इंद्राणी मुखर्जीचा जामीन नाकारला होता.
सर्वोच्च न्यायालयात इंद्राणी मुखर्जीकडून ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. त्यांनी म्हटलं, इंद्राणी मुखर्जी कलम ४३७ अंतर्गत विशेष सूट मिळवण्यास ती पात्र आहे आणि ती बऱ्याच काळापासून तुरुंगात आहे.
युक्तीवाद करताना रोहतगी यांनी म्हटले, २३७ पैकी ६८ साक्षीदार तपासण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून इंद्राणी मुखर्जीला पॅरोल देण्यात आलेला नाही.
यावर पॅरोल का दिला नाही अशी विचारणा न्यायालयाने केली असता रोहतगी यांनी म्हटलं, आपण पॅरोल घेतला नाही. मात्र, त्यांचे पती पीटर मुखर्जी यांना जामीन मिळाला आहे.
शीना बोरा हत्याकांड प्रकरण
२ मे २०१२ रोजी रायगड जिल्ह्यातील जंगलात एका मुलीचा मृतदेह आढळला. या मृतदेहची चौकशी सुरु झाल्यानंतर तीन वर्षांनी अर्थात २०१५ साली या हत्येचा उलगडा झाला.
या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीच्या ड्रायव्हरला अटक केल्यावर सर्व प्रकरण समोर आलं. इंद्राणी मुखर्जीने शीनाला मुंबईतील वांद्रे परिसरात बोलावून तिचा गळा आवळून हत्या केली आणि तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील जंगलात नेऊन टाकला. पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा हिच्याशी आई इंद्राणी मुखर्जीचा वाद व्हायचा आणि त्यातूनच या हत्येचं षडयंत्र रचल्याचं समोर आलं. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी, इंद्राणीचा ड्रायवर श्यामवर राय, इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जी आणि पहिला पती संजीव खन्ना याला अटक करण्यात आली.
इंद्राणीने शीना ही आपली मुलगी नाही तर बहीण असल्याचं सांगितलं होतं. दुसऱ्या पतीचा अर्थात पीटर मुखर्जी याचा मुलगा राहुल याच्यासोबत शीनाचे प्रेमसंबंध होते. पीटर मुखर्जी यांना २०२० मध्ये जामीन मंजूर झाला. न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान इंद्राणी आणि पीटर मुखर्जी या दोघांचा घटस्फोट झाला.

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *