Breaking News

सीएसटी इमारतीमधून मध्य रेल्वेचे मुख्यालय हलवणार रेल्वेमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीत चर्चा

जागतिक वारसा लाभलेल्या सीएसटी इमारतीमधून मध्य रेल्वेचे मुख्यालय इतरत्र हलवण्यात येणार आहे. रेल्वेचे मुख्यालय हलवून ही ऐतिहासिक इमारत जागतिक रेल्वेचे संग्रालय( म्यूझियम) म्हणून नावारुपास येईल. रेल्वेमंत्र्यांच्या २९ नोव्हेंबरच्या मुंबई दौऱ्यात या विषयी चर्चा करण्यात आली. दरम्यान, काही तज्ज्ञांनी या इमारतीचे रेल्वे म्यूझीयममध्ये रुपांतर करण्यास विरोध दर्शविला आहे. तरीही या इमारतीमधून रेल्वेचे मुख्यालय हलवण्यात येणार आहे.

सीएसटीच्या ऐतिहासिक इमरातीचे दीर्घ काळ जतन व्हावे, यासाठी रेल्वेने व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. सन २०१८-१९ मध्ये इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी  ४१ कोटी रुपये खर्चाची तरतूद केलेली आहे. यामध्ये इलेक्ट्रीक सब स्टेशन, टेलिफोन एक्सचेंज इतरत्र हलवले जाणार आहे. याला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची मंजुरी मिळणे बाकी आहे. दरम्यान, मध्य रेल्वेचे मुख्यालय इतरत्र हलवून ही इमारत जागतिक दर्जाचे रेल्वे म्यूझीयम म्हणून विकसीत करण्याचा रेल्वे विभागाचा मानस आहे. पंरतु काही तज्ज्ञांनी याला विरोध दर्शविला आहे. दरम्यान, काही जाणकांरांच्या सल्ल्यानंतर इमरातीसाठी काम केले जाणार आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेचे मुख्यालय सीएसटीवरून हलवल्यानंतर पी. डेमेलो रोडवर नवे मुख्यालय उभारले जाणार आहे. नव्या इमारतीच्या कामाचा प्रस्ताव तयार असून तो मंजूरीसाठी पाठवला जाणार आहे. नवी इमारत तयार होईपर्यंत काही दिवस मध्य रेल्वेचे मुख्यालय सीएसटीमध्ये राहील. किंवा रेल्वेच्या इतर इमारतीमध्ये हे कार्यालय हलवण्याची शक्यता आहे. दरम्यान, नव्या जागेसाठी रेल्वे विभाग लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Check Also

सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली

पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *