Breaking News

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर

नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आ. रवींद्र फाटक आदी मान्यवर उपस्थित होते

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विकास राज्य शासनामार्फत विकास कामे सुरु आहेत. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्यानेही स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच इतर विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अंबरनाथ मध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून त्या ठिकाणी अधिष्ठाता देखील नियुक्त करण्यात आले आहेत. कळवा येथील रुग्णालयामधील कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी विभाग कॅशलेस करण्यात आलेला आहे. रेडिओलॉजीच्या माध्यमातून जे उपचार होणार आहेत ते माफक दरामध्ये देण्यात येणार आहेत. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सतत पाठपुरावा केल्याचा आवर्जून उल्लेख करुन त्यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य अभियाना अंतर्गत यापूर्वी दीड लाखापर्यंत उपचाराची मर्यादा होती. या मर्यादेत वाढ करून आता पाच लाखापर्यंत उपचार घेता येणार आहेत. राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित या अंतर्गत चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य योजना देखील राज्यांमध्ये राबविण्यात येत आहेत, असे सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे डोंबिवली पश्चिम येथील मासळी बाजार, डोंबिवली पूर्व येथील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथील शवविच्छेदनगृह, नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU ), सुनील नगर येथील अभ्यासिका आदी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

Check Also

पालघरमध्ये भाजपाच्या उमेदवारीचे बनावट पत्र प्रसिद्ध

पालघर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याबाबतचे भाजपा केंद्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *