Breaking News

भानुशाली दुर्घटनेतील मृतकांच्या वारसांना ५ लाख: कंत्राटदाराची जबाबदारी तर जखमींना ५० हजाराची म्हाडाकडून जाहीर

मुंबई: प्रतिनिधी
शहराच्या ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेल्या फोर्टमधील भानुशाली इमारतीचा भाग कोसळून ६ जणांचा मृत्यू तर ३ जण गंभीररित्या जखमी झाले असून १८ रहिवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात यश आले. यापैकी मृतकांच्या वारसांना ५ लाखाची मदत तर गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजार आणि किरकोळरित्या जखमी झालेल्यांना २५ हजार रूपयांची तातडीने मदत देण्याची घोषणा म्हाडाकडून जाहीर करण्यात आली. तसेच या इमारत कोसळण्याप्रकरणी ना हरकत प्रमाणपत्र धारकास जबाबदारी निश्चित करण्यात आल्याची माहिती म्हाडातील अधिकाऱ्यांनी दिली.
गुरूवारी १६ जुलै २०२० रोजी दुपारी भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळून दुर्घटना झाली. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली असून जकमी झालेल्यांना जे.जे. रूग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
भानुशाली इमारती ही उपकरप्राप्त इमारत असून त्याच्या दुरूस्तीसाठी म्हाडाच्या मुंबई दुरूस्ती व पुर्नरचना अर्थात आरआरबोर्डाने तेथील रहिवाशी-भाडेकरूंना ३-९-२०१३ रोजी ना-हरकत प्रमाणपत्र जारी केले. त्या प्रमाणपत्राच्या आधारे आय-ओडी-नकाशे मुंबई महापालिकेने २-६-२०१८ रोजी ना हरकत प्रमाणपत्रधारकास दिली. तर काम सुरु करण्याचा परवाना १-६-२०१९ रोजी मुंबई महापालिकेने प्रमाणपत्रधारकास दिला. तसेच या इमारतीच्या दुरूस्तीच्यावेळी इमारत कोसळल्यास, किंवा अपघात-दुर्घटना आदी घटना घडल्यास त्याची जबाबदारी ना हरकत प्रमाणपत्र धारक मंडळाच्या कंत्राटदारावर राहणार असल्याने या इमारतीचे काम करणाऱ्या या अपघाताची जबाबदारी कंत्राटदारावर निश्चित करण्यात आल्याचे म्हाडाच्या अहवालात नमूद करण्यात आले

.

Check Also

भारतीय राज्यघटना बदलली तर राष्ट्र कोलमडेल

देशातील अठरापगड जातधर्माचे १४० कोटी लोक राज्यघटनेमुळे एकत्र नांदत असून देश एकसंघ आहे. भारतीय राज्यघटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *