Breaking News

मोठा निर्णयः १० वी , १२ वीची परीक्षा पुढे ढकलली; या महिन्यात होणार शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर आमि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोरोनातून १० वी आणि १२ वी च्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार १० वीच्या परिक्षा जून तर १२ वीच्या परिक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ट्विटरद्वारे केली.
कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असून सद्यपरिस्थितीत तरूणांमध्येही याची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि जीवीताची सुरक्षा महत्वाची असल्याने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज शिक्षण विभागाचा आढावा घेतला. त्यात परीक्षा पुढे ढकलण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक नुकसान होवू नये दृष्टीकोनातून १० वी ची परिक्षा जून मध्ये तर १२ वीची मे महिन्याच्या अखेरीस घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रीज बोर्ड यांनाही पुणे बोर्डाने घेतलेल्या निर्णय स्विकारावा आणि त्यानुसार परीक्षा घ्यावी अशी विनंती पत्राद्वारे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१२ वीच्या परीक्षा सुधारित कार्यक्रमानुसारच घ्याव्यात
१२ वीच्या परीक्षा घोषित सुधारित कार्यक्रमानुसारच घेतल्या जाव्यात. हे करतांना १२ वीच्या विद्यार्थ्यांना पुढे आय.आय.टी, जेईई आणि नीट च्या परीक्षा देऊन इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचे असतात हे लक्षात घ्यावे, त्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या.
तयारी पूर्ण करा, एसओपी तयार करा
आपण ज्या तारखांना १२ व्या परीक्षा जाहीर करू त्याच तारखांना त्या घेता याव्यात यादृष्टीने व्यवस्था विकसित करण्यात यावी. केंद्रांची संख्या वाढवावी, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती निश्चित कराव्यात, मोठे हॉल शोधले जावेत, विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर (विरळ) बसवावे, परीक्षा केंद्राची, प्रसाधनगृहांची स्वच्छता, त्यांचे निर्जंतुकीकरण याकडे लक्ष देण्यात यावे. परीक्षांच्या आयोजनासाठी लागणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळाचे नियोजन करण्यात यावे, दरम्यानच्या काळात परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सर्व कर्मचारी-अधिकारी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे. याची एक परिपूर्ण आणि सुनियोजित कार्यप्रणाली(एसओपी) शालेय शिक्षण विभागाने निश्चित करावी असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वंदना कृष्णा यांनी यासंदर्भातील विभागाचे सादरीकरण केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री बच्चू कडू, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे उपस्थित अधिकारी यांनी आपली मते आणि भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Check Also

कोकण-पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने दिला दिलासा पुन्हा होणार JEE-Main ची परिक्षा-शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर आणि दरड  कोसळण्याच्या घटना घडल्या. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *