Breaking News

माथाडी कामगारांची कर्जवसूलीच्या नावाखाली होणारी लूट थांबणार परस्पर होणाऱ्या पगार कपातीला कामगार विभागाकडून फुलस्टॉप

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील माथाडी कामगारांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत त्यांच्या पगारीतून वारेमाप पध्दतीने कर्जवसूली करणाऱ्या पतसंस्था, पतपेढ्या, खाजगी बँकांच्या वसुलीला आता कामगार मंडळाने चाप लावण्याचा निर्णय घेतला. तसेच या अनुषंगाने कामगार विभागाने नुकताच शासन निर्णयही प्रसिध्द केला.
राज्याच्या विविध भागात जवळपास २ लाख ५ हजार माथाडी कामगारांची नोंद आहे. त्यापैकी १ लाख १० हजार माथाडी कार्यरत आहेत. मात्र यातील अनेक माथाडी कामगार हे अशिक्षित असून त्यांच्या या गोष्टीचा गैरफायदा पतसंस्था, खाजगी बँकांकडून घेण्यात येत आहे. सदर कामगाराची आर्थिक कुवत न पाहता या बँका, पतपेढ्यांकडून वारेमाप कर्जाचे वाटप करण्यात येते. या कर्जाच्या वसूलीसाठी सदर बँकाकडून माथाडी मंडळाला पत्र पाठवून मिळणाऱ्या पगारातून परस्पर कपात केली जाते. प्रसंगी कर्जाच्या प्रमाणात त्याची वसूली न करता ती बऱ्याचवेळा जास्त प्रमाणात असल्याचे कामगार विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
विशेषतः या पतसंस्था, बँकाकडून माथाडी कामगाराला मिळणारा बोनस, वाढीव पगार, पगारीला उशीर झाल्याने त्यापोटी मिळणाऱ्या दंडाची रक्कम यातील टक्केवारीही कर्जापोटी वळवून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यामुळे कामगारांच्या हाती त्यांनी केलेल्या कष्टाच्या प्रमाणात योग्य ती रक्कम हातात पडत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांचे हाल होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरवर्षी कामगारांना दिलेल्या कर्जाच्या वसूलीपोटी १००० ते १२०० कोटी रूपये या बँका, पतसंस्थां आणि बँकांकडे वळते केले जात होते. यातील अनेक पतपेढ्या या राजकिय नेत्यांच्या असून यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि अविनाश रामिष्टे यांच्याही संस्थेचा समावेश आहे. परंतु याप्रश्नी आता कामगार विभागानेच पुढाकार घेत अवैध पध्दतीने होणाऱ्या कर्जवसुलीला चाप लावत पगारातील कपात थांबविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
बेकायदेशीर पध्दतीने पगारातून वसुली करणाऱ्या संस्था-बँकांची यादी
१) अखिल भारतीय माथाडी कामगार सह.ग्राहक सोसायटी
२)अखिल भारतीय माथाडी ट्रान्स. आणि जन.काम.युनियन
३) हिंदूस्थान माथाडी ट्रान्स. जन. काम. युनियन
४) हिंदूस्थान माथाडी ट्रान्स. जन. काम. सेना
५) जनसागर माथाडी कामगार सह.पतपेढी
६) महाराष्ट्र राज्य मा. ट्रा. आणि जन.काम.युनि.
७) महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी माथाडी युनियन
८) महाराष्ट्र श्रमिक कामगार सह.पतपेढी
९) शिवसागर माथाडी कामगार सह.पतपेढी
१०) अण्णासाहेब पाटील सह.कामगार पतपेढी
११) अण्णासाहेब पाटील माथाडी सह.ग्राहक सोसायटी
१२) देना बँक
१३) स्टेट बँक ऑफ इंडिया
१४) बँक ऑफ इंडिया

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *