Breaking News

राज्यातील १० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या रजनीश सेठ एसीबी महासंचालक पदी नियुक्ती

मुंबई: प्रतिनिधी

पोलिस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला असून यशस्वी यादव यांची विशेष महानिरिक्षक सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा विभागातूनसह पोलिस आयुक्त मुंबई शहर या पदावर करण्यात आली. तर मधुकर पाण्डे यांची वाहतूक विभागाच्या सह आयुक्त पदावरून सागरी व विशेष सुरक्षेच्या विशेष महानिरिक्षक पदावर नियुक्त केली. विशेष सुरक्षा विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) येथे नियुक्ती झाली. तर दिपक शिवानंद पाटील यांची सुधार सेवा विशेष पोलिस महानिरिक्षक या पदावरून नाशिकच्या पोलिस आयुक्त पदी करण्यात आली.  राजकुमार व्हटकर यांची यांची नवी मुंबई सह आयुक्त पदावरून मुंबई शहर पोलिस प्रशासन विभागात करण्यात आली. छेरिंग दोर्जे यांची नाशिक मधून सुवार सेवा विभागाच्या विशेष पोलिस महानिरिक्षक पदावर, मनोज लोहिया यांची नांदेडहून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक म्हणून तर प्रताप दिघावकर यांची नाशिकच्या विशेष पोलिस महानिरिक्षक पदी बदली करण्यात आली.

आयपीएस अधिकारी राजेंद्र सिंह यांची अप्पर पोलिस महासंचालक (विशेष अभियान ) पोलिस महासंचालक कार्यालातून अप्पर पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था पोलिस महासंचालक कार्यालयात करण्यात आली. अमितेशकुमार यांची मुंबईच्या सह आयुक्त राज्य गुप्तवार्तामधून नागपूरच्या पोलिस आयुक्त पदी पदोन्नती करण्यात आली. जय जीत सिंह यांची रेल्वे अप्पर पोलिस महासंचालक वरून अप्पर पोलिस महासंचालक पदी लाचलुचपत विभागात करण्यात आली. सदानंद दाते यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परतल्याने मीरा भाईंदर-वसई-विरार च्या पोलिस आयुक्तालयात करण्यात आली.  भुषण कुमार यांची वाहतूकच्या अप्पर पोलिस महासंचालक पोलिस महासंचालक कार्यालयात करण्यात आली. तर कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची पुन्हा लाचलुचपत विभागाच्या महासंचालक पदी, संजय कुमार यांची नवी मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून अप्पर पोलिस महासंचालक प्रशिक्षण व खास पथकाच्या पोलिस कार्यालयात करण्यात आली असून यासंदर्भातील आदेश राज्य सरकारकडून उशीरा जारी करण्यात आले.

नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी बिपीनकुमारसिंह यांची नियुक्ती झाली आहे. तर कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची पुन्हा लाचलुचपत विभागाच्या महासंचालक पदी, संजय कुमार यांची नवी मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून अप्पर पोलिस महासंचालक प्रशिक्षण व खास पथकाच्या  पोलिस कार्यालयात करण्यात आली असून यासंदर्भातील आदेश राज्य सरकारकडून उशीरा जारी करण्यात आले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *