Breaking News

मुख्यमंत्र्यांचे आदेश, ओमायक्रॉन रोखायचेय लसीकरण वेगाने पूर्ण करा जगभर ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार, मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता

मराठी ई-बातम्या टीम
ओमायक्रॉन विषाणुच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजे, यादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
महाराष्ट्राने सध्या १२ कोटीं ३ लाख १८ हजार २४० डोसेस दिले असून ४ कोटी ३७ लाख ४६ हजार ५१२ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. ७ कोटी ६५ लाख ७१ हजार ७२८ लोकांनी एक डोस घेतला आहे.
१८ ते ४४ वयोगटात ७६.६९ लोकांनी कमीत कमी १ डोस तर ४५ पेक्षा अधिक वयोगटातील ८५.२५ टक्के लोकांनी एक डोस घेतलेला आहे. गेल्या १२ तासात संपूर्ण जगात ओमायक्रॉनच्या रुग्णात ४५ टक्के वाढ झाली असून ५४ देशात याचा प्रसार झाला आहे.
फ्रान्समध्ये दैनंदिन रुग्ण ४० हजारच्या पुढे आढळत असून जर्मनीत ही संख्या ५० हजाराच्या आसपास आहे. ऑस्ट्रीयामध्ये देखील कोविड सुरु झाल्यापासून सगळ्यात मोठी लाट आली असून दररोज ७ हजारच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत.
अमेरिकेत देखील नोव्हेंबर २०२० सारखी परिस्थिती उद्भवली असून दररोज एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. दक्षिण आफ्रिकेत गेल्या २ आठवड्यात नवीन रुग्णात मोठी वाढ झाली असून दररोज दुपटीने रुग्ण आढळत आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील काळजी घेण्याची गरज असून आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळले गेलेच पाहिजे यावर भर देण्याची सूचना त्यांनी सांगितले.
मागील शनिवारी डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर लगेच रविवारी पुणे-पिंपरी चिंचवड येथे ७ रूग्ण आढळून आले तर रविवारी मुंबईत २ रूग्ण आढळून आले. त्यामुळे या विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याचे दिसून येत आहे. काल मंगळवारी फक्त राज्यात ओमायक्रोनच्या नव्या रूग्णाचा माहिती पुढे आली नाही. मात्र नवे रूग्ण सापडणार नाहीत असे नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लसीकरणाचा वेग वाढविण्याचे आणि परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Check Also

मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा चढता आलेख ८ हजाराच्या जवळ मुंबईत तर ओमायक्रॉन ६८

मराठी ईृ-बातम्या टीम मागील जवळपास आठवडाभरापासून मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्येत चढता आलेख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *