Breaking News

Tag Archives: corona vaccination

अमित शाह यांची मोठी घोषणा, लसीकरण मोहिम संपताच सीएए कायदा लागू मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विरोधक सुवेंदू अधिकारी यांची माहिती

भारताचे नागरीक असल्याचे सिध्द करण्यासाठी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए कायदा लागू करण्यावरून काही वर्षापूर्वी मोठा गदारोळ उडाला होता. मात्र आता पुन्हा एकदा हा कायदा लागू करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले असून देशात लसीकरण मोहिम संपताच नागरिकत्व लागू करणार असल्याचे जाहिर केले. पश्चिम बंगाल मधील …

Read More »

मुख्यमंत्र्यांचा इशारा, पुन्हा बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा, मास्क वापरा कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखा

राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत: हून मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रुग्णांमध्ये फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळल्यास त्यांची तत्काळ आरटीपीसीआर …

Read More »

१ जानेवारीपासून होणार ‘हे’ ६ बदल, जाणून घ्या… मुलांचे लसीकरण, एटीएममधून पैसे काढणे, कपडे-पादत्राणे खरेदी, ऑनलाईन बुकिंग यासह ६ गोष्टीं महागणार

मराठी ई-बातम्या टीम नवीन वर्ष म्हणजे २०२२ आपल्यासोबत अनेक बदल घेऊन येणार आहे. या बदलांचा तुमच्या जीवनावरही परिणाम होईल. १ जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणे आणि कपडे आणि पादत्राणे खरेदी करणे महाग होणार आहे. १ जानेवारीपासून होणार्‍या ६ बदलांबद्दल आपण जाणून घेऊया. 1. ATM मधून पैसे काढणे महागणार आरबीआयने मोफत व्यवहारानंतर रोख पैसे काढण्यावरील शुल्क वाढवण्यास मान्यता दिली आहे. बँका सध्या ग्राहकांकडून प्रति व्यवहारासाठी २० रुपये आकारतात. त्यात करांचा समावेश नाही. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, मोफत व्यवहारानंतर बँका त्यांच्या ग्राहकांकडून प्रति व्यवहार २० ऐवजी २१ रुपये आकारू शकतील. त्यात करांचा समावेश नाही. हा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे. 2. कपडे आणि पादत्राणे खरेदी करणे महाग होईल  कपडे आणि पादत्राणांवर १ जानेवारीपासून १२ टक्के जीएसटी आकारला जाईल. भारत सरकारने कापड, रेडिमेड आणि फुटवेअरवरील GST ७ टक्क्याने वाढवला आहे. याशिवाय, ऑनलाइन पद्धतीने ऑटो रिक्षा बुकिंगवर ५ टक्के जीएसटी आकारला जाईल. म्हणजेच ओला, उबेर यांसारख्या अॅप आधारित कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर प्लॅटफॉर्मवरून ऑटो रिक्षा बुक करणे आता महाग होणार आहे. मात्र, ऑफलाइन पद्धतीने ऑटो रिक्षाच्या भाड्यात कोणताही बदल होणार नाही. तो कराच्या बाहेर ठेवण्यात आला आहे. 3. मुलांना कोरोनाची लस देशात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी १ जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी १० वी वर्ग ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. 4. पोस्ट पेमेंट बँकेने वाढवले शुल्क इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खातेधारकांना १ जानेवारीपासून रोख रक्कम काढणे आणि ठराविक मर्यादेपेक्षा जास्त ठेवींसाठी शुल्क भरावे लागेल. बेसिक सेव्हिंग अकाउंटमधून दर महिन्याला ४ वेळा पैसे काढणे मोफत असेल. परंतु त्यानंतर प्रत्येक पैसे काढल्यावर ०.५० टक्के शुल्क भरावे लागेल जे किमान २५ रुपये असेल. मात्र, बचत खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. बेसिक सेव्हिंग अकाऊंट व्यतिरिक्त बचत खाते आणि चालू खात्यात १०,००० रुपये जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. १० हजार नंतर ०.५० टक्के शुल्क आकारले जाईल. जे प्रति व्यवहार किमान २५ रुपये असेल. बचत आणि चालू खात्यांमध्ये दरमहा २५,००० रुपयांपर्यंत रोख काढणे विनामूल्य असेल आणि त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ०.२५ टक्के शुल्क आकारले जाईल. 5. अॅमेझॉन प्राइमवर क्रिकेट सामने Amazon च्या OTT प्लॅटफॉर्मवर आता प्राइम व्हिडिओवर लाइव्ह क्रिकेट सामने पाहता येणार आहेत. Amazon प्राइम व्हिडिओ पुढील वर्षी १ जानेवारी २०२२ पासून न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेसह थेट क्रिकेट स्ट्रीमिंग खेळात प्रवेश करत आहे. 6. कार महागार नवीन वर्षात तुम्हाला मारुती सुझुकी, रेनॉल्ट, होंडा, टोयोटा आणि स्कोडा यासह जवळपास सर्वच कार कंपन्यांच्या कार खरेदी करण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागेल. टाटा मोटर्स १ जानेवारी पासून व्यावसायिक वाहनांच्या किमती २.५ टक्के वाढवणार आहे. Share on: WhatsApp

Read More »

ओमायक्रोनचा अजून अभ्यास झाला नाही, पण आपण डेंजर झोनमध्ये राष्ट्रीय टास्क फोर्सचे सदस्य डॉ.व्हि.के.पॉल यांचा इशारा

मराठी ई-बातम्या टीम जगभरात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे भितीचं वातावरण आहे. हा व्हेरिएंट आधीच्या डेल्टा किंवा डेल्टा प्लसपेक्षा कमी घातक असल्याचं जरी बोललं जात असलं, तरी अद्याप त्याचा पूर्ण अभ्यास होणं बाकी असल्यामुळे शास्त्रज्ञ आणि संशोधक अजूनही छातीठोकपणे निर्धोक राहण्याचा सल्ला देत नाहीत. पण लसीकरणामुळे आपण मास्क घालण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे आदेश, ओमायक्रॉन रोखायचेय लसीकरण वेगाने पूर्ण करा जगभर ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार, मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता

मराठी ई-बातम्या टीम ओमायक्रॉन विषाणुच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजे, यादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. महाराष्ट्राने सध्या १२ कोटीं ३ लाख १८ हजार २४० डोसेस दिले असून ४ कोटी ३७ लाख ४६ …

Read More »

सेरोप्रिव्हेलन्स संशोधनानुसार १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आवश्यक दोन डोस घेतलेल्या व्यक्तीमध्ये अँटिबॉडीज सेरोप्रिव्हेलन्सचं प्रमाण ९२ टक्के, तर लस न घेतलेल्या व्यक्तीमध्ये फक्त ६८ टक्के

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या इतर ठिकाणी संशोधनाबाबत लोकसंख्या/समुदायातील प्रतिसाद जाणून घेण्यासाठी सेरोप्रिव्हेलन्स अभ्यास महत्त्वाचा आणि आवश्यक होता. SARS-CoV-2 संसर्ग, संसर्गासाठी लोकसंख्या आधारित निर्देशक आणि साथीच्या रोगांवर सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी समुदायाच्या प्रतिसादाचे मोजमाप करण्यासाठी सेरोप्रिव्हेलन्सचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. याकरिता आयसीएमआर या संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून …

Read More »

राज्यात तीस नोव्हेंबर पर्यंत शंभर टक्के लसीकरण करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना उद्दिष्ट्य

मुंबई : प्रतिनिधी विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. कोरोनाची साथ …

Read More »

आता सरकारी आणि आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही दोन लसमात्रा बंधनकारक अन्यथा प्रवासाला मज्जाव- राज्य सरकारकडून नवे अध्यादेश

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागात कार्यरत कर्मचारी व अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी यांना आता दोन लसींची मात्रा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर या कर्मचाऱ्यांनी दोन लस मात्रा आणि १४ दिवासांचा कालावधी पूर्ण केला नसेल तर आता अशा कर्मचाऱ्यांना रेल्वे लोकल प्रवासासह अन्य …

Read More »

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाची अतुलनीय कामगिरी दिवसभरात सुमारे अकरा लाख नागरिकांचे लसीकरण

मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून …

Read More »

पॉझिटिव्हीटी दर वाढला मग लसीकरणही वाढवा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त असून या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यानुसार यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या चारही जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा जास्त आढळून येत आहे. …

Read More »