Breaking News

संरक्षण प्रमुख बिपीन रावत प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर कोसळले ११ जण ठार, २ जणांची प्रकृत्ती गंभीर

मराठी ई-बातम्या टीम
देशाचे संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांच्यासह १४ जण प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर तर दोनजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना तामीळनाडू राज्यातील कुनूर येथे झाला. या अपघातात संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांच्याबाबत नेमके काय घडले याची नेमकी अधिकृत माहिती केंद्र सरकारकडून अद्याप जाहिर करण्यात आलेली नसली तरी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लष्कर प्रमुख नरवडे आदीजणांच्या त्यांच्या घरी जावून रावत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांच्यासह १४ जण mi-17 V5 या हेलिकॉप्टरने दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले. मात्र कुनूर येथे हेलिकॉप्टर कोसळूनही दुर्घटना घडली. सुरुवातीला या अपघातात हेलिकॉप्टरमधील ५ जण जागीच ठार झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्यानंतर यातील मृतकांच्या संख्येत वाढ होवून बातमी प्रसिध्द होईपर्यंत ही संख्या ११ पर्यत वाढली.
बिपीन रावत यांच्यासोबत लष्करातील अनेक अधिकारी या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते. यापैकी नेमके कोण बचावले कोणाचा मृत्यू झाला याबाबतची अधिकृत माहिती अद्याप केंद्र सरकार किंवा लष्कराकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु हवाई हलाने या दुर्घटनेाबाबत दुजोरा दिला.
दुर्घटनेची माहिती कळताच तामीळनाडू मुख्यमंत्री स्टॅनिल यांच्या आदेशानुसार तामीळनाडूचे वन मंत्री के. रामचंद्र हे घटनास्थळी पोहोचले त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेत ५ व्यक्तींचा मृत्यू झालेला होता दोघांची प्रकृती गंभीर होती. यातील जखमींना आणि इतरांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे हेलिकॉप्टरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत त्याचे ठिकठिकाणीतुकडे पडल्याचे दिसून येत होते. अपघात झालेले ठिकाण हे डोंगराळ भागात असल्याने तेथे पोहोचण्यास प्रशासनाला अडचणी येत होत्या. मात्र स्थानिक नागरीकांसह बचाव कार्यातील टीमने घटनास्थळी पोहचून मदतकार्यास सुरुवात केली.
या अपघाताचे वृत्त कळताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्तींनी आपापले कार्यक्रम रद्द केल्याचे समजते आहे.

Check Also

विधिमंडळ आणि परिसरात आमदारांच्या वर्तनासाठी जारी केली ही आचारसंहिता विधिमंडळ आणि परिसरात आमदारांच्या वर्तनासाठी जारी केली ही आचारसंहिता

मराठी ई-बातम्या टीम अधिवेशन काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि भाजपा आमदार नितेश राणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *