Breaking News

राज्यात रूग्णांच्या संख्येत १२०, तर मृतकांच्या संख्येत ७ ने वाढ ६६ रूग्णांना घरी पाठविले, ८६८ वर बाधीत

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील नागरिकांना सातत्याने विनंती करूनही सतत रस्त्यावर गर्दी करणे, कारण नसताना घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आज दिवसभरात १२० नव्या रूग्णांचे निदान झाले असून मृतकांच्या संख्येत ७ ने वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोगाग्रस्तांची संख्या ८६८ वर पोहोचली मृतकांची संख्या ५२ वर पोहोचल्याने परिस्थिती चिंताजनक बनत चालल्याचे दिसून येत आहे.

दिवसभरात मुंबईत ६८, पुणे ४१, सातारा २, अहमदनगर, २, जालना १, औरंगाबाद ३, वसई-विरार २, नाशिक १ अशा १२० नव्या रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले. त्यामुळे मुंबईतील रूग्णांची संख्या ५२६, पुणे शहर-ग्रामीण -१४१, सांगली- २५, ठाणे जिल्हा-८५, अहमदनगर २३, नागपूर-१७, औरंगाबाद-१०, लातूर-८, बुलढाणा-सातारा: प्रत्येकी ५, यवतमाळ-४, उस्मानाबाद-३, कोल्हापूर-रत्नागिरी-जळगांव-नाशिक: प्रत्येकी २, सिंधूदुर्ग-गोंदीया-वाशिम-अमरावती-हिंगोली- जालना: प्रत्येकी १, इतर राज्य-२ असे मिळून १२० रूग्ण आढळून आले.

राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांमध्ये पुरूषांचे प्रमाण जास्त असून हे प्रमाण ७३ टक्के इतके आहे. आतापर्यंत या आजारामुळे ४५ वर्षाखालील फक्त एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित मृत्यू हे ६१ वर्षावरील व्यक्तींचे आहेत. आजपर्यंत १७ हजार ५६३ जणांचे नमूने तपासण्यात आले. त्यापैकी १५ हजार ८०८ जणांचे अहवाल हे निगेटीव्ह आले. तर ८६८ जण पॉझिटीव्ह आढळून आले. आतापर्यत ६६ कोरोनाबधीत रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवून देण्यात आले. तर ३२ हजार ५२१ जण घरी आणि ३ हजार ४९८ जण हे संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *