Breaking News

पर्वत आणायला गेल्यासारखे जाऊ नका, नाहीतर पोलिसरूपी हनुमान घेवून जातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी

‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवलं पाहिजे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदीआदेश जारी केले आहेत. तरीही लक्ष्मणाचे प्राण वाचविण्यासाठी हनुमानाने जसा औषधी झाडासह पर्वत आणला तसे आणण्यासाठी बाहेर पडला तसे बाहेर पडू नका असा विनंती करत नाहीतर पोलिस रूपी हनुमान तुम्हाला घेवून जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत   बंदीआदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकलं जाईल असा सज्जड दमही त्यांनी आज भरला.

कोरोनाच्यासंदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. कोरोनाप्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील असा देत हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर, हनुमान जयंतीला घरातच थांबण्याची गरज असून उद्या घराबाहेर न पडण्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना संसर्गाची  साखळी  तोडणे आणि नागरिकांचा जीव वाचवणे हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून  देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, कोरोनाला प्रसाराची संधी न देणं आणि कोरोनाची साखळी तोडणं, ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *