Breaking News

मुंबई महानगराची वाटचाल १० हजाराकडे: नव्याने ७९० सापडले मुंबई-ठाणे मिळून ९ हजार ७०९ वर संख्या पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी
दोनच दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या १० हजारने ओलांडली असताना मुंबई आणि ठाणे मंडळ मिळून लवकरच ही संख्या ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत राज्यात नव्याने ७९० रूग्ण आढळून आले असून राज्याची संख्या १२ हजार २९६ वर पोहोचली आहे. तर मुंबई शहरातील बाधितांची संख्या ८ हजार ३५९ वर तर मुंबई- ठाणे मंडळाची मिळून ९ हजार ७०९ वर पोहोचली.
राज्यात आतापर्यत २००० तर आज १२९ रूग्ण बरे होवून घरी गेले. तर ३६ जणांचा मृत्यू झाला. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २७, पुणे शहरातील ३, अमरावती शहरातील २, तर वसई विरार मधील १, अमरावती जिल्ह्यामधील १ तर औरंगाबाद मनपामधील १ मृत्यू आहे. या शिवाय प. बंगालमधील एका जणाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,६१,०९२ नमुन्यांपैकी १,४८,२४८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १२,२९६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ८४४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १०,५१३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ४४.४० लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे –
1. आजपर्यंत राज्यातून २,००० रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
2. सध्या राज्यात १,७४,९३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२,६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ८३५९ ३२२
ठाणे ५७
ठाणे मनपा ४६७
नवी मुंबई मनपा २०४
कल्याण डोंबवली मनपा १९५
उल्हासनगर मनपा
भिवंडी निजामपूर मनपा २०
मीरा भाईंदर मनपा १३९
पालघर ४४
१० वसई विरार मनपा १४४
११ रायगड २७
१२ पनवेल मनपा ४९
  ठाणे मंडळ एकूण ९७०९ ३४८
१३ नाशिक
१४ नाशिक मनपा ३५
१५ मालेगाव मनपा २१९ १२
१६ अहमदनगर २६
१७ अहमदनगर मनपा १६
१८ धुळे
१९ धुळे मनपा १९
२० जळगाव ३४ ११
२१ जळगाव मनपा १२
२२ नंदूरबार १२
  नाशिक मंडळ एकूण ३८९ ३०
२३ पुणे ८०
२४ पुणे मनपा ११८७ ९५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७२
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा १०८
२८ सातारा ३६
  पुणे मंडळ एकूण १४९० ११०
२९ कोल्हापूर १०
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली २९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग
३४ रत्नागिरी १०
  कोल्हापूर मंडळ एकूण ६०
३५ औरंगाबाद
३६ औरंगाबाद मनपा २१५
३७ जालना
३८ हिंगोली ३७
३९ परभणी
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण २६८ १०
४१ लातूर १२
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा
  लातूर मंडळ एकूण २०
४७ अकोला १२
४८ अकोला मनपा ३७
४९ अमरावती
५० अमरावती मनपा २८
५१ यवतमाळ ७९
५२ बुलढाणा २१
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण १८२ १२
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा १४०
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
  नागपूर एकूण १५१
  इतर राज्ये २७
  एकूण १२२९६ ५२१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *